पाचोऱ्यात "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा क्र.-२ तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा बक्षीस वाटप कार्यक्रम मोठ्या संख्येने संपन्न..
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा) १८एप्रिल : आज पाचोरा येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक-२ तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा बक्षीस वितरण सन २०२४-२५ सोहळा व्यापारी भवन येथे संपन्न झाला. प्राथमिक शिक्षण विभागामधुन तालुक्यातील निपाणे तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील पाचो-यातील गो.से. हायस्कूल ह्या दोघेही शाळांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पाचोऱ्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बक्षीस विजेत्यांना एक लाख रुपये पारितोषिक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन शाळेचा गौरव करण्यात आला.
आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा तालुक्यामधील सुंदर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शाळेमधील शिक्षक-शिक्षिकांचे अभिनंदन करत कौतुक केले. व शिक्षण विभागाने उत्कृष्ट प्रकारे काम करून शिक्षणाचा दर्जा वाढविला आहे. आणि शिक्षकांचा गौरव केला. दरम्यान, तालुका शिक्षण अधिकारी यांनी शिक्षा विभागाकडे अधिक लक्ष द्यावे, असेही आमदार पाटील यांनी सुचविले.
याप्रसंगी पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे, तालुका गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील, अधीक्षक शालेय पोषण आहार पाचोरा सरोज गायकवाड, खलील देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, बांबरूडचे उपसरपंच मनोज वाघ, शिक्षक सेनेचे राजेंद्र पाटील, विजय ठाकुर, तालुक्यामधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment