पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव "कृषी दुत" पुरस्काराने सन्मानित..आ.किशोर पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

पाचोरा तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश जाधव यांना मधुर खान्देश वृत्तपत्राच्या वतीने “कृषीदूत” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. श्री. जाधव यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध शेतकऱ्यांच्या योजना तसेच महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

या पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, भाजपचे नेते मधु भाऊ काटे,अनिल भाऊ महाजन,प्रदीप देसले,माजी नगरसेवक विकास पाटील, जितेंद्र जैन,मनोज शांताराम पाटीलयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराने श्री. रमेश जाधव यांच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळाली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.(शब्दांकन: राहुल महाजन मधुर खान्देश)

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद