सौ.अल्पा कोटेचा व कल्पना पाटील ह्यांना शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
गिरणाई शिक्षण संस्था संचलित,
श्री पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथील गणित व विज्ञान विषयाच्या विषयाच्या उपशिक्षिका सौ.अल्पा अमरीश कोटेचा व इंग्लिश विषयाच्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना ज्ञानेश्वर पाटील
यांचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळालेले आहे,
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विषय गणित गट ९ व १०, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळण्याबाबत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे त्याचप्रमाणे इंग्लिश विषय उपशिक्षक श्रीमती कल्पना पाटील यांना या स्पर्धेत विषय इंग्लिश गट ९ व १० जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळालेले आहे.
आजच्या युगामध्ये अनेक माध्यमांद्वारे शिकवणे हे अनिवार्य झाले आहे. शिक्षक, शिक्षिका, पालक, आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अध्यापन-अभ्यासात कायम नवनवीन अनुभव आणि तंत्रज्ञान आधारित माहिती द्यावयाची असल्याने शिक्षकांनी सतत नव्या गोष्टी शिकणे गरजेचे झाले आहे. यातूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विषय शिकवतानाच शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचे उत्तम कार्य त्यांनी केले आहे.
डिजिटल ज्ञानाचा वापर करून आजचे अध्यापन सुस्पष्ट, स्पष्ट, आकर्षक करता येते. हेच उघड करत ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यानिकेतन जळगाव येथे दि. ४ एप्रिल २०२५ रोजी शुक्रवारी जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपशिक्षिका सौ.अल्पा कोटेचा व श्रीमती कल्पना पाटील यांनी सादर केलेल्या शैक्षणिक व्हिडिओस द्वारे प्रथम क्रमांक पटकावून गौरव संपादन केला.
गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.मा. तात्यासो पंडितराव शिंदे , उपाध्यक्ष .श्री. नीरजजी मुणोत, सहसचिव श्री.प्रा. शिवाजी शिंदे सचिव.श्री.जे.डी. काटकर , शाळे चे मुख्याध्यापक, ह्यांनी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment