डॉक्टर पिनाक प्रवीण शेंडे यांनी एम.बी.बी.एस. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शेंडे परिवाराचे नाव उंचावले.…!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा):डॉक्टर पिनाक प्रवीण शेंडे यांनी एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शेंडे परिवाराचे नाव उंचावले आहे. स्वर्गीय एकनाथ दगडू वाणी यांचा नातू व गायत्री मेडिकलचे संचालक श्री प्रवीण शेंडे व कवयित्री नीता शेंडे यांचे चिरंजीव आहेत .डॉक्टर पिनाक विखे पाटील कॉलेज, अहिल्यानगर येथे शिक्षण घेत आहेत.शेंडे परिवार व नातेवाईक यांत प्रथम एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. तसेच पाचोरा वाणी समाजात देखील प्रथम एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. सर्व समाज बांधवांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. महाराष्ट्र लाड शाखीय वाणी समाज व महाराष्ट्र वाणी युवा मंच तसेच लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ यांच्याकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा त्यांनी दिल्या.तसेच सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
  डॉ. पिनाक यांस पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद