*दोंडाईचा बस स्थानकात जल सेवेचा शुभारंभ...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
सध्याच्या रणरणत्या उन्हात शीतल जलची आवश्यकता असताना दोंडाईचा तील समाजसेवी तरुणानी बस स्थानकात रविवारी दि.६ ला पानपोई सुरु केली.
या वर्षी तापमान खूप जास्त असल्याने गोरगरीब जनता, लहान बालक तसेच सर्व जेष्ठ नागरिकांसाठी  फिल्टर पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यांत आली. या पानपोईचे  आर्थिक सहायक गुप्त आहेत.या पानपोईच्या उदघाटन दोंडाईचा पो. स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक हेमंत राउत, दोंडाईचा बस आगाराचे सह व्यवस्थापक जगदीश पाटील,स्थानकवासी  संघाचे माजी अध्यक्ष रमेश कर्णावट,जैन सकल संघाचे अध्यक्ष मनोज मालू, यांच्या हस्ते करण्यात आले.सदर पानपोईचे प्रकल्पप्रमुख भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष धनराज श्रीश्रीमाळ, दोंडाईचा शहर व ग्रामीण मराठी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र टाटीया सर आहेत.तसेच या पानपोईच्या उदघाटन प्रसंगी नामको बैंकचे सल्लागार नेमीचंद सोलंकी, अशोक कुचेरिया,गणेश कोटेचा,शेखर कोठारी,दिनेश कर्णावट,महेंद्र चोपड़ा,नीरज मालु,पुष्पक टाटीया,ॲड.मितेश टाटीया,निशांत कोठारी तसेच पत्रकार संघाचे विकास बागुल,पांडुरंग शिंपी आदी उपस्थित होते *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद