पाचोरा-यातील कै.पि.के.माध्यमिक विद्यालय पुनगाव रोड येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिना निमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले.


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील  कै.पि.के.माध्यमिक विद्यालय पुनगाव रोड येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेला  ज्येष्ठ शिक्षक डी.आर.
कोतकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.जी.व्ही
सोमवंशी सर होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक हेमंत टोणपे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती एस.एस.ताड मॅम यांनी केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सु.ना.पाटील सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट विविध उदाहरणांसह समजावून सांगितला श्री.एस.एच.मोरे सर,श्री.डी.ए.पाटील, सुषमा पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री.जी.व्ही
सोमवंशी सर यांनी सांगितले की *संविधानाने आम्हाला दिले काय.? तर माणसाला जगण्याचा हक्क आणि न्याय* असेही शेवटी ते आपल्या भाषणातून म्हणाले.शेवटी आभार प्रदर्शन श्री.आर.बी धोबी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.व्ही.पी.देशमुख सर,श्री. अशोक दत्तू पाटील सर श्री.सुशील महाजन सर, श्री. प्रदीप राठोड सर,श्री.राजेश परदेशी सर यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद