आज दिनांक १३एप्रिल २०२५ रविवारी भडगाव येथे आयोजित खान्देश विभागीय वधुवर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव - भडगाव येथील डी एड कॉलेज च्या प्रांगणात खान्देश स्तरीय मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्री बाबुलाल मोरे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून चोपडा चे आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे, पाचोरा-भडगाव चे कार्यसम्राट आमदार आप्पासाहेब किशोर पाटील उपस्थित होते. यावेळी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी वधू वर परिचय मेळावा प्रत्येक समाजासाठी आवश्यक आहेत 
तसेच किशोर अप्पासाहेब यांनी मेळाव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. भविष्यात होणाऱ्या सामुहिक वधुवर विवाह सोहळ्यात प्रत्येक  जोडप्याला ११,००० ची देणगी माझ्याकडून राहील असे वचन दिले या कार्यक्रमाला मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.नोंदणी केलेल्या वर वधू नी आपला परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आयोजन समिती प्रमुख अनिल सावळे, सुनील मोरे, दिलीप सोनवणे संजय कोळी यांनी परिश्रम केले कार्यक्रम चे सूत्रसंचालन प्रा.अशोक तायडे यांनी केले तर आभार योगेश सोनवणे यांनी मानले.


यावेळी चाळीसगाव येथील रघुनाथ खलाणे, राकेश चित्ते, मछिंद्र कोळी, समाधान सोनवणे(बाबा फिटर), सुनिल कोळी(वाघ),कजगाव चे संजय कोळी,जामदाचे  दीपक काकडे, उत्राण चे सोनवणे, पंडित जोहरे (शेंदुर्णी),  ॲड.गणेश सोनवणे(जळगाव), बाळा सोनवणे, अनिल सोनवणे, पाचोरा चे पि.के.सोनवणे, ॲड.शांतीलाल अमृत सैंदाणे,संभाजी शेवरे, दशरथ जाधव,  तुकाराम कोळी,म.रा.पत्रकार प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा,  तालुकाध्यक्ष सुनील महारु मोरे,शहराध्यक्ष अनिकेत सुर्यवंशी , राजेंद्र मोरे,राजेंद्र खैरनार(पत्रकार), विजय बागुल, राजेंद्र कोळी(बाबाजी), जगदीश शेवरे, वडजी चे नेहरु शेवरे,भडगावचे  समाधान कोळी, अजय कोळी,नगरदेवळ्याचे एकनाथ कोळी यांनी कार्यक्रम यशस्वी‌करीता प्रयत्न केले. यावेळी मोठया संख्येने समाज महिला भगिनीं व समाज बांधव ही उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद