जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत चेतना हिरे हीचे यश
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल,)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2025 भडगाव
विद्यार्थी सेवा समिती आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील द्वितीय वर्ष साहित्य ची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने उत्तेजनार्थ या क्रमांकाचे पारितोषक मिळवल्याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. भरत शिरसाठ यांच्या हस्ते ,सन्मानचिन्ह , रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन भडगाव येथील नालंदा बुद्धविहार येथे गौरविण्यात आले.चेतना हिला महाविद्यालयाच्या प्रा. जयश्री वर्मा - वाघ यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment