वाचन संस्कृती वाढण्यासाठी वाचनालयांची गरज...गुलाबराव खैरनार : संत नामदेव महाराज सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचा शुभारंभ
नाशिक : सध्याच्या मोबाईल युगात वाचनाची आवड कमी होत चालली आहे. वास्तविक, वाचनातून व्यक्तीच्या ज्ञानात भर पडत असते. वाचनामुळे जीवनाला दिशा मिळते व वाचन संस्कृती वाढल्यानंतर समाजाची सुधारणा होऊन सुसंस्कृत पिढी तयार होते. म्हणून वाचन संस्कृती वाढण्यासाठी वाचनालयांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक गुलाबराव खैरनार यांनी केले.
सिडको (नाशिक) येथील कै. भिकन कृपाराम जगताप बहुउद्देशीय संस्था संचलित संत नामदेव महाराज सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रामनवमीच्या शुभमुर्तावर गुलाबराव खैरनार यांच्या हस्ते संत नामदेव महाराज सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नंदलाल जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक नंदलाल जगताप यांनी वाचनालय सुरु करण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले, की पुस्तकांसारखा सारखा दुसरा गुरु नाही, असे त्यामुळेच म्हटले जाते. वाचनाची आवड असणारे वाचक सर्व प्रकारची पुस्तके किंवा वर्तमानपत्रे विकत घेऊन वाचू शकत नाहीत. अशावेळी त्यांची वाचनाची भूक या वाचनालयाच्या माध्यमातून भागवली जाणार आहे. अनेक यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल हा केवळ चांगले वाचन केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे समाजाची जडणघडण चांगली व्हावी, सध्याच्या पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आम्ही हे वाचनालय सुरु केले असल्याचे नंदलाल जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी सी. झेड. जाधव, बाळासाहेब गायकवाड, बाळू खोडके, उल्हास सांगळे, मधुकर संन्याशिव व समाजबांधव उपस्थित होते. बाबासाहेब गायकवाड यांनी आभार मानले *✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment