संत गाडगेबाबा पानपोई चे जुगनू चौक येथे उदघाट्न..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज दिनांक 2 एप्रिल रोजी जुगनू चौक मित्र मंडळतर्फे जुगनू चौकात मोफत जलसेवा सुरू करण्यात आली.या वर्षी तापमान खूप जास्त असल्याने गोरगरीब जनता, लहान बालक तसेच सर्व जेष्ठ नागरिकांसाठी फिल्टर पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यांत आली. या पानपोईच्या उदघाटन दोंडाईचा शहर व ग्रामीण मराठी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र टाटीया सर आणि ज्येष्ठ पत्रकार जे पी नाना यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास अध्यक्ष सहदेव भावसार,उपाध्यक्ष नामदेव थोरात,सदस्य जगदीश चौधरी,अंबालाल भावसार,मछिंद्र पवार,लोटन पवार जितेंद जगताप आदी उपस्थित होते.
सदर पानपोई जुगनू चौक मित्र मंडल च्या आर्थिक सहकार्याने 30 वर्षा पासून सुरू आहे.या मित्र मंडळातर्फे इतर समाजोपयोगी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते *✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा*
Comments
Post a Comment