अस्मिता महिला मंडळ,ठाणे यांनी आयोजित केलेला "महिला दिन" कार्यक्रम उत्साहात संपन्न...


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
*श्री क्ष.अ.शिंपी सेवा समाज,ठाणे संचलित  "अस्मिता महिला मंडळ,ठाणे" आयोजित "महिला दिनाचा कार्यक्रम" दि.३१ मार्च, २०२५ रोजी श्रीमती विमलताई खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.*
      *कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी, संत शिरोमणी नामदेव महाराज आणि आद्य स्री-शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांचे हस्ते पूजन, पुष्पहार अर्पण करुन झाली.*
      *त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीत सौ.स्मिता सुभाष जगताप यांनी सुमधूर आवाजात सादर केले. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत, सत्कार करण्यात आला. सौ.वैशाली धाडणकर यांनी "महिला दिन" संदर्भात प्रबोधनपर भाषण केले. सौ हर्षदाताई बोरसे यांनी एक शिंपी अनेक शिंपी पोटजाती विषयी आपले मत व्यक्त केले व नागपूर अधिवेशनाबद्दल थोडक्यात माहिती दिली. सौ.चेतनाताई गवांदे, यांनी महिलांच्या सामाजिक समस्यांबाबत विचार मांडले. प्रमुख अतिथी सौ.सरलाताई अनिल जगताप यांनी त्यांच्या व्यवसायासंबंधी माहिती देऊन महिलांनी देखील छोटे-मोठे व्यवसाय करुन स्वयंपूर्ण व स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. सौ.शिल्पाताई संतोष सोनवणे यांनी सर्व महिलांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.*
 *त्यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची, स्ट्रॉ केसात खोचणे, बॉटल उचलणे असे विविध खेळ घेण्यात आले. विजेत्यांना सुंदर अशी बक्षीसे देण्यात आली.  उपस्थित महिलांसाठी दोन लकी ड्रॉ पण ठेवण्यात आले होते, त्यातील विजेत्यांना देखील सुंदर साड्या भेट देण्यात आल्या.*
  *महिलांसाठी स्नेहभोजन देखील आयोजित केले होते. सर्वांनी संपूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद व मनसोक्तपणे आनंद घेतला.*  
 *कार्यक्रमासाठी मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त व माजी समाजाध्यक्ष श्री.विजयनाना बिरारी, अ.भा.महिला आघाडी उपाध्यक्षा सौ.अरुणानानी बिरारी यांनी चांगली आर्थिक मदत केली.  तसेच मोलाचे मार्गदर्शनही केले. तसेच प्रमुख अतिथी सौ.सरलाताई जगताप आणि सौ.शिल्पाताई सोनवणे यांच्याकडूनही भरीव आर्थिक मदत झाली. त्याचप्रमाणे ठाणे संस्थेचे अध्यक्ष श्री.मनोहर जगताप, सदस्य श्री.संजय खैरनार आणि मध्यवर्ती संस्थेचे माजी सरकार्यवाह श्री.रामेश्वर धाडणकर यांचे देखील नियोजनाच्या दृष्टीने बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.*
 *ठाणे महिला मंडळाच्या आधारस्तंभ श्रीमती सुजातानानी चव्हाण, माजी अ.भा.महिला आघाडी अध्यक्षा सौ.हर्षदाताई बोरसे, अस्मिता महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ.कल्पनाताई भांडारकर, मुंबई जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ.चेेतनाताई गवांदे, सौ. क्षितिजाताई शिंपी, सौ.उषाताई बागुल,पनवेल, सौ.रजनीताई जगताप यांचे  देखील कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान लाभले. सगळ्यांचे खूप खूप आभार.*
 *महिला मंडळाच्या सदस्या सौ.राजश्री सोनवणे, सौ.वैशाली धाडणकर, सौ.रंजना जगताप, सौ.जयश्री बागुल यांनी खेळाचे, कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या सांभाळले. तर सौ.योगिता शिंपी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सूत्रसंचालन करुन कार्यक्रमात खूपच रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा झाला  ✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद