नविन विभक्त शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, नाव वाढ, नाव कमी शिधापत्रिकेबाबत.....!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा):-1) नविन /विभक्त शिधापत्रिका आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
1) शिधापत्रिका नमुना। अर्ज
2) पुर्वीची शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला
3) ग्रामपंचायत नमुना 8 चा उत्तारा / भाडेकरार पत्र.
4) तहसिलदार यांचे उत्पन्न दाखला
5) सर्वांचे आधारकार्ड (स्व-साक्षांकीत)
6) मुलांचे जन्माचा दाखला
7) विभक्त बावत स्वयघोषना पत्र
8) गॅस नोंद पुस्तक (छायाकिंत)
9) बैंक खाते पासबुक ची (छायाकिंत प्रत)
महाराष्ट्र शासन राजपत्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 1) नविन/विभक्त शिधापत्रिका साठी लागणारा कालावधी 30
दिवस (1 महिना)
2) दुबार शिधापत्रिका
शिधापत्रिका हरवली व गहाळ झाली किंवा फाटली जिर्ण झाली असल्यास दुबार शिधापत्रिका मिळण्यासाठी www.rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर दुबार शिधापत्रिका प्रत विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दुबार शिधापत्रिका (खराब फाटलेली इ.) देतानी गृहभेट आवश्यक असल्यास 30 दिवस अन्यथा 6 दिवस / दुबार शिधापत्रिका
(शिधापत्रिका गहाळ झाल्यास 30 दिवसाचा कालावधी लागतो
3) नाव समाविष्ट करणे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1) नमुना अर्ज 8
2) मुळ शिधापत्रिका
3) जन्माचा दाखला
4) नाव कमी करणे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1) नमुना अर्ज 9
2) मुळ शिधापत्रिका
3) विवाह नोदनी दाखला
4) आधार कार्ड
5) विवाह नोदनी दाखला
6) नाव कमी केल्याचा सक्षम अधिकार्याचा दाखला
शिधापत्रिका संबंधीत लागनारी शासकीय फी खालील प्रमाणे :-RCMS पोर्टल फो 50/- रुपये आणी महा ई सेतु केंद्र पावती फी 35/- रुपये प्रमाणे आहे.
4) मृत्यु झालेले व्यक्तीचे प्रमाणपत्र
5) सर्वांचे आधारकार्ड (स्व-साक्षांकीत)
ऑनलाईन ई- शिधापत्रिका सुविधा आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1) ई- शिधापत्रिका काढण्यासाठी https://rems.mahafood.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा
2) वरील संकेतस्थळाचा वापर करुन Public Login हा पर्याय निवडून नविन युजर आयडी (New User ID ) तयार करावा.
3) त्यानंतर लॉगीन करुन कुंटुंबातील सर्व सदस्याची माहिती भरावी.
4) सर्व माहिती भरुन झाल्यानंतर नाव कमी केलेचा दाखला, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, सर्वांचे आधार कार्ड अपलोड
करावेत. सर्वात शेवटी सबमीट ऑप्शनवर क्लिक करावे
5) सर्व माहिती भरुन झाल्यानंतर पेमेंट लिंक येते. पेमेंट लिंक वर क्लिक केल्यानंतर शासकीय फी भरली जाते
6) ऑनलाईन अर्ज भरलेली प्रिंट व सर्व कागदपत्र तहसिल कार्यालय, पाचोरा (पुरवठा शाखा येथे जमा करावीत म्हणजे
शिधापत्रिका मंजूर करण्याची कार्यवाही करता येईल.
ऑनलाईन ई-शिधापत्रिकासाठी VLE (CSC आपले सरकार केंद्र यांच्याकडे अर्ज करावे तसेच मध्यस्थी दलाल मार्फत कोणीही शिधापत्रिके संबंधीत कामकाज करु नये. तसेच शासकीय फी च्या व्यतिरीक्त कोणतेही व्यवहार एजंट/शासकीय कर्मचारी मार्फत करु नये. अशी कोणतेही आर्थिक व्यवहार केल्यास पुरवठा निरीक्षण अधिकारी किंवा तहसिलदार पाचोरा यांच्याकडे तक्रार करावी. तसेच आपल्या अर्जाबाबत माहिती घ्यावयाची असल्यास श्री. शुभम सपकाळे पुरवठा लिपीक (मो.9096593747) यांच्याशी दुरध्वनी साथता येईल.
प्रति,
सर्व संपादक, वै.
प्रत : जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांना माहितीसाठी व कार्यवाहीसाठी अग्रेषित,
स्वाक्षरोत (विजय बनसोडे) तहसिलदार पाचोरा
Comments
Post a Comment