दोंडाईचा धुळे चौफुलीवरील भंगार गोडाऊनला भीषण आग आगीत लाखोंचे प्लास्टीक व इतर साहित्य जळून खाक
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा- येथील दोंडाईचा धुळे चौफुलीवरील मोहमंद्दीया नगरकडे जाणाऱ्या गरिब नवाज शेजारील,कनोरी नाल्यालगत असलेल्या फारूख हाजी पिंजारी यांच्या भंगार गोडाऊनला रात्री दोन -अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागून, आगीत गोडाऊनमध्ये ठेवलेले लाखों रूपयांचे प्लास्टीक व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.पहाटेपर्यत आग विझवण्यात आली असुन, दोंडाईचा पोलीस स्थानकात उशीरापर्यंत अग्नी उपद्रवाची नोंद करण्याचे काम सुरू होते. मात्र उन्हाळ्यात अचानक रात्री लागलेल्या आगीमुळे जवळच रहिवासी परिसर असलेल्या गरिब नवाज काॅलनीतील नागरीक चांगलेच भयभीत झाले होते ✍️✍️ श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा
Comments
Post a Comment