नगरदेवळा एस.के.पवार विद्यालयाचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
नगरदेवळा ता.पाचोरा :
सरदार एस. के.पवार माध्यमिक विद्यालयाचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहे.
राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMSE) घेतली जाते. शै. वर्ष सन २०२४-२५ साठी २४ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी विद्यालयातील विविध स्तरातील एकुण ४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील जिल्हा गुणवत्ता यादीत विद्यालयाच्या ७ विद्यार्थ्यांनी स्थान पटकवले व शिष्यवृत्तीस पात्र झाले.गुणवत्ता यादीत स्थान पटकवलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा प्रत्येकी १०००₹ म्हणजे वर्षाचे १२०००₹ असे चार वर्षात एका विद्यार्थ्यासाठी ४८०००₹ मिळतात.यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप मोठी आर्थिक मदत होते.आठ वर्षांपासून NMMS परिक्षेत गुणवत्ता यादीत स्थान कायम ठेवण्याची परंपरा पवार विद्यालयाने सुरू ठेवलेली आहे
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी
१)सोनवणे दुर्गेश रवींद्र(८६गुण)
२)महाजन किंजल संदीप(८६गुण) ३)तोमर श्रावणी जितेंद्रसिंग(७९गुण) ४)महाजन प्रांजल सत्यवान(७८गुण)
५)पाटील मयुर सोनूसिंग(७७गुण)
६)बागुल समीक्षा किशोर(७४गुण)
७)वाणे मानव संजू(७१गुण)
या विद्यार्थ्यांना शाळेतील उपशिक्षक तथा परीक्षा समन्वयक निखिल प्रकाश शिरुडे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामशिक्षण समितीचे व्हा.चेअरमन सुभाष थेपडे,चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन पाटील,वामन पाटील, गनी शेख, नथू पाटील, संचालक मंडळ, प्राचार्य के. एन. काटकर, उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल,ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.डी. ठाकूर व ए .सी.आमले, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment