जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी गणेश कोटेचा सचिवपदी दिनेश कर्नावट यांची स्तृत्य निवड...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
दोंडाईचा येथील जैन सोशल ग्रुपची सभा घेण्यात आली त्यांत नवीन वर्षाची कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदी गणेश कोटेचा व सचिवपदी दिनेश कर्नावट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली दोंडाईचा शहरात जैन सोशल ग्रुप तर्फे सामाजिक कामात अग्रसेर असुन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे .त्यात आरोग्य शिबीर घेणे.मुलांना वह्या वाटप करणे.सर्वसामान्य कुटुंबातील अपघातग्रस्त अथवा आजारी रूग्णाला पंलग.खुर्च्या,गादी ,वाकर आदी साहित्य विनाशुल्क देणे तसेच दरवर्षी गणपतीची स्थापना करुन गणेशोत्सव अत्यंत उत्साहांत साजरा करीत असतात, अशी सामाजिक कामे वर्षभर या ग्रुपच्या माध्यमातून होत असतात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेश पारख आहेत माजी अध्यक्ष संजय दुग्गड यांनी नुतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकारिणीत उपाध्यक्ष डाॅ किशोर कर्नावट.सचिव दिनेश कर्नावट सहसचिव अमरीश चतुरमुथा कोषाध्यक्ष नरेंद्र भंडारी संचालक मनोज मालु रविंद्र कोठडिया जयदिपशेठ कमलेश कांकरिया सुमित चतुरमुथा नवनीत रूणवाल यांची निवड करण्यात आली नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ✍️✍️ *श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा*
Comments
Post a Comment