भडगाव येथे उद्या कामदा एकादशी ला भव्य श्रीराम रथोत्सव
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव - भडगाव शहराला 350 वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीराम रथो त्सव 8 एप्रिल ( कामदा एकादशी) या दिवशी भव्य दिव्य रथ उत्सव निघणार आहे या बाबत दिनांक 22 रोजी रात्री 8 वाजता श्रीराम मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली या बैठकीत प्रभू श्रीराम रथ उत्सव चांगल्या उत्साहात निघणार असून पंच क्रोशीतील व जिल्हा भरातील श्रीराम भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समिती तर्फे करण्यात आले कामदा एकादशी च्या दिवशी निघणाऱ्या रथावर प्रभू श्रीराम, सिता माता, लक्ष्मणं भैया, याच्या सह अर्जुन, भालदार, चोपदार, दोन घोडे, अहिरम बहिरम,, बजरंग बली, रथा च्या मागे दोन माकडे,व सजवलेला रथ स्वाद्य निघणार आहे ही मिरवणूक दुपारी 4 वाजता भडगाव शहरातून रथ मार्गे निघणार आहेतरी सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Comments
Post a Comment