पाचोरा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी व जल संशोधक नामदेव विश्राम महाजन यांचा पाचोरा तालुका कृषि विभागा मार्फ़त सत्कार करण्यात आला.!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भारतीय कृषि अनुसंधान संशोधन परीषद,नवी दिल्ली (ICAR) अंतर्गत कृषि भवन येथे जलसंधारण अंतर्गत आयोजीत शेतकरी परीषदेत पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परीसरातील प्रगतशील शेतकरी व जलसंशोधक नामदेव विश्राम महाजन (नाना महाजन) यांना जलस्त्रोताची जलधारणा शक्ती वाढवण्यासंदर्भात आपल्या निरीक्षण संशोधन व अभ्यासाचा मार्गदर्शक म्हणुन आमंत्रीत करण्यात आलेले होते.
  सदर कार्यक्रमात त्यांनी जमीनीत खालावत चाललेली जलधारण शक्ती कशा पध्दतीने व तंत्रज्ञानाने मृद संधारण पुरक जलस्त्रोतांची बळकटीकरण कामे केली पाहिजे त्यासंदर्भात मार्गदर्शक करतांना जमीन उताराच्या दिशेने खालच्या बाजुस  " शोष खड्डा " करुन शिवारात  असलेल्या कुपनलीका,विहीरीस भुमीगत जलस्त्रोत वाढवण्यासाठी महत्वपुर्ण ठरते. या उपचारामुळे शेती वाया न जाता जलस्त्रोताचे बळकटीकरण होवुन पाण्याची पातळी वाढते यावर त्यांनी आजतागायत अवर्षण प्रवण भागात केलेल्या अभीनव असा  " पाणी अडवा पाणी जिरवा "  या कमी श्रम दानातुन जलसंधारणाचा उपक्रमाचा मृत साठ्याच्या वाढीकरीताचा  उपक्रम हा शेतकरी हिताचा व उत्पादन वाढीसाठी प्रभावशील असे संशोधन सर्वांसमोर मांडले.पुढील विवेचनात आपल्या संशोधन कार्यातुन केलेल्या संशोधनात हजारो शेतकरी या उपक्रमात सहभाग वाढवुन हजारो विहरी व कुपनलीका मधे पाणीसाठ्यात वाढ झाली.या  अभीनव उपक्रमाची मा. तालुका कृषीi अधीकारी श्री आर.एन.जाधव यांनी दखल घेत जलसंशोधक नाना महाजन यांचा पाचोरा तालुका कृषी अधीकारी कार्यालयाकडुन विशेष सन्मानीत करीत क्षेत्रीय अधीकारी कर्मचारीवर्गाला या अभीनव उपक्रमाचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना कसा होईल व जलधारण शक्ती वाढवण्यास त्याचा कसा फायदा होईल या बाबत मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद