प्रथमच भडगाव शहरात टिव्ही शो चे आयोजन करण्यात आले.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(भडगाव)Sun Tv Marathi या मराठी चॅनल वरील "सोहळा सख्यांचा" या महिलांसाठी साठी असलेल्या कार्यक्रमांचे चित्रीकरण नुकतेच भडगाव शहरात दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी प्रथमच करण्यात आले.कार्यक्रमास महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली तसेच सर्वांनी मनमुराद पणे कार्यक्रमाचा आनंद लुटला अनेक महिलांना खेळ खेळताना बक्षिसे मिळाली. सौ सीमा सोनवणे यांनी"संगीत खुर्ची" मध्ये "प्रथम" क्रमांक पटकावला. त्यांचे अभिनंदन करण्यात आले. काही महिलांनी आपल्या माहेरच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या भडगाव च्या महिला भगिनींसाठी सौ.योजना ताई पाटील, सौ.वैशाली पाटील आणि सौ.मंजुषा देशमुख यांनी खूप कमी कालावधीमध्ये अथक परिश्रम करून महिलांसाठी या कार्यक्रमाचे नियोजन केले. त्याबद्दल सर्व महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले. एक दिवस स्वतःच्या आनंदासाठी मनमुरांदपणे जगण्याचा अनुभव सर्वांनी घेतला . आलेल्या सर्व महिलाना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे निवेदक मराठी हास्य कलाकार आशिष पवार यांनी कार्यक्रम खूप रंगतदार बनवला सर्वांशी लहान भावाप्रमाणे वर्तन करून सर्व खेळ घेण्यात आले त्याबद्दल आयोजकांनी सन मराठीच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
Comments
Post a Comment