पाचोरा शहरातील "तीनआबांची" जोडी एकमेकांची कधी न साथ सोडी... गेली 40 वर्षापासून असलेली ही त्रिमूर्ती आबांची जोडी...




 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा शहरातील नामांकित बिल्डर व माजी नगरसेवक दत्तात्रय बोरसे यांना"आबा" या नावाने ओळखत असून त्यांचा पाचोरा शहरात सर्व राजकीय पक्ष व सर्व सामाजिक पक्ष यांच्याशी संबंध असून त्यांनी राजकारणात कधीही गैरफायदा न घेता फक्त समाजकारण केले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री  एकनाथरावजी खडसे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध असून त्यांच्याशी ते एकनिष्ठ व प्रामाणिक असून त्यांनी सर्व जाती धर्म कधीही भेदभाव न करता सर्वांशी मैत्री संबंध जोडत असतात आज त्यांना पाचोरा शहरात आबासाहेब या नावाने ओळखतात तसेच लक्ष्मण सूर्यवंशी टोपण नाव "आबा" असून त्यांचा पाचोरा शहरातील गेल्या अनेक वर्षापासून श्री राजे छत्रपती शिवाजी चौक येथे रंगकाम पेंटिंग व्यवसाय त्यांचे मोठे बंधू व ते स्वतः करीत असून आजही त्याची कला पाचोरा शहरात असून त्यांच्या पेंटिंगची कला गेल्या 40 ते 50 वर्षापासून त्यांचे भिंतीवरील रंग पेंटिंग व ती कला आजही त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली असून आपला पेंटिंग व्यवसाय व्यतिरिक्त त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये प्रवेश करून उत्तम प्रकारे चांगल्या बातम्या रोखठोक लिखाण तसेच सत्य बातमी प्रकाशित करून आपला ठसा आजही उमटवलेला असून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे त्यांचे नाव आजही पाचोरा शहरात "आबासाहेब"लक्ष्मण सूर्यवंशी या नावानेच त्यांची ओळख आहे  तसेच अनिल येवले यांनाही पाचोरा शहरात आबा या नावाने ओळखत असून त्यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून असून कुठलाही स्वार्थ न ठेवता ते आता फक्त 24 तास सेवा कोणाचेही काम असो किंवा कोणाचा कॉल ही आला लगेच कामासाठी तत्परतेने हजर कोणाकडे कुठलीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थ काम करणारी व्यक्ती म्हणजेच "आबासाहेब" हीच त्यांची पाचोरा शहरात ओळख असून त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे डॉक्टर,वकील,पत्रकार,प्राध्यापक, शिक्षक सामाजिक क्षेत्रातील महिला कार्यकर्ता तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे वाढदिवस असो किंवा सामाजिक कार्य असो त्यांचा उत्तम प्रकारे मान-सन्मान देऊन लेख लिहून त्यांचा गौरव करीत असतात.
 यामुळे त्यांची पाचोरा शहरात एक वेगळी ओळख असून त्यांना "आबासाहेब" या नावाने ओळखत असतात अशाप्रकारे या तीन आबांची जोडी असून त्यांची ही जोडी अशीच सही सलामत शेवटपर्यंत असो हीच सदिच्छा..

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद