शाळेतील स्टॉप रुममध्ये बोलवून शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग.


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचार विनयभंगगाच्या घटना समोर येत असून, यामुळे प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

पुणे, बदलापूर, अकोला, घटनेनंतर आता जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

शाळेतील स्टॉप रूममध्ये बोलवून एका शिक्षकाने नववीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तसेच मुलीला मिठी मारत तिचे चुंबन घेऊन अशिल कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. बदलापूर, अकोला आणि पुण्याच्या घटनेनंतर आता जळगाव जिल्हयात अशी घटना समोर आल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद