भडगाव येथील देशमुख महाविद्यालयात आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगांव  येथील सौ रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व   विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १  मार्च २०२५ रोजी "समकालीन समाजात सामाजिक शास्त्राची भूमिका" या मुख्य विषयावर आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. ही परिषद कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पीएम उषा यांच्या मदतीने ही परिषद घेण्यात आली या परिषदेचे उद्घाघाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले या उद्घाघा टन  सोहळ्याचे अध्यक्ष व्हाईस चेअरमन तथा सिनेट सदस्य नानासाहेब व्हि टी जोशी हे होते, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य मा. अमोल दादा पाटील संस्थेचे संचालक मा. आबासाहेब दत्तात्र्यय पवार, मा.मनिषाताई पाटील, हे उपस्थित होते.या प्रसंगी देशातील १२५ संशोधकांचे लेख असलेली स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या परिषदेत बीजभाषण लखनऊ येथील डॉ. भीमराव आंबेडकर केंद्रीय विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रोफेसर नंदकिशोर मोरे यांनी केले, या उद्घ घाटन सत्राचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ दीपक मराठे यांनी मानले. या परिषदेचे तीन सत्रात कामकाज झाले. पहिल्या तांत्रिक सत्रात पुणे येथील भारतीय जैन संघटनेचे महाविद्यालय येथील भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ ज्योतिराम मोरे यांनी जल व्यवस्थापन व समकालीन समाज या विषयावर आपले शोध कार्य मांडले. या नंतर गुजरात राज्यातील वलसाड येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील डॉ जयंतीलाल बारीस यांनी भारतीय समकालीन समाजात नाटक व अभिनय यांची भूमिका या विषयावर अभिनयातून आपली भूमिका साकारली. दुसऱ्या सत्रात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला महाविद्या लयातील डॉ प्रकाश बनसोडे यांनी समाज व कर्करोग या विषयावर अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. या नंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील इतिहासाचे अभ्यासक नाट्य लेखक डॉ नरसिंग परदेशी यांनी समाज विकासात व त्याचा जडण  घडणीत इतिहासाची भूमिका आणि त्यातील नोकरीच्या संधी या विषयावर सखोल असे व्याख्यान दिले. तिसऱ्या सत्रात विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ जयंत लेकुरवाळे यांनी समाजातील समाज माध्यमाचा वापर व त्याचा समाजावरील परिणाम या विषयावर अतिशय सुंदर उदाहरणे देऊन आपले मनोगत मांडले. शेवटी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हसदी येथील डॉ आर डी देवरे महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ शिवाजी पाटील यांनी समकालीन समाज व आताच्या काळातील विचार, माध्यमे या विषयावर अतिशय सुंदर असे अभ्यासपूर्ण विचार मांडले. 
समारोप सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहूणे म्हणून व्यासपीठावर सांगोला येथील डॉ प्रकाश बनसोडे व स्थानिक व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा डॉ शिवाजी पाटील हे उपस्थित होते या प्रसंगी या परिषदेचे समन्वयक प्रोफेसर संजय भैसे यांनी या परिषदेचा अहवाल सादर केला. आभार परिषद सचिव डॉ देवेंद्र मस्की यांनी मानले
ही परिषद यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रोफेसर डॉ संजय भैसे संयोजन सचिव डॉ देवेंद्र मस्की आयोजन समितीतील डॉ बी एस भालेराव, डॉ सचिन हडोळतीकर, डॉ गजानन चौधरी डॉ दीपक मराठे व महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक व प्राध्यापके तर कर्मचारी बंधू , विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी खूप परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद