दोंडाईचा शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने महिलादिन उत्साहात संपन्न.....
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला मंडळ दोंडाईचा यांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रम समाज मंगलकार्याच्या जागेवर दुपारी ४ वाजता जागतीक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सुरूवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शितलताई कोंटुरवार यांच्या शुभहस्ते श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिमेचे व पुजा करून दिपप्रज्वलन करण्यात आले यावेळी समाजातील भगीनिसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ,यात विनोदी उखाणे,मॅचीग वेशभूषा आणि संगित खुर्ची सासुबाई व सुनबाई ग्रुप स्पर्धा यांचा समावेश होता. विनोदी उखाणे स्पर्धाचे पहिले सौ कविता खैरनार, दुसरे बक्षीस सौ भारती गवळे,तिसरे तिसरे बक्षीस सौ सुरेखा जाधव, तसेच मॅचिग स्पर्धाचे पहिले बक्षीस सौ हेमलत्ता पवार, दुसरे बक्षीस सौ जयश्री चित्ते, तिसरे बक्षीस सौ कल्पना बागुल, संगित खुर्ची सासुबाई ग्रुप सौ. भारती जगताप, सुनबाई ग्रुप सौ. कविता खैरनार ,यांनी पारितोषिके पटकावली. सदर कार्यक्रमास आलेल्या सर्व महीलांना गुलाबपुष्प देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला विविध मनोरंजना बरोबरच अल्पोहार आस्वाद महिलांनी घेतला सदर कार्यक्रम महिलांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमांची संकल्पना सौ शितलताई कोंटुरवार उपाध्यक्षा सौ पुनमताई साळुंखे सचिव सौ वर्षा खैरनार यांनी एक आगळावेगळा असा सुंदर कार्यक्रमांचे नियोजन केले असुन कार्यक्रमास जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखा जाधव अ.भा.शिंपी समाज मध्यवंर्ती संस्थेचे सहप्रसिद्धी प्रमुख सौ सुनिता शिंपी महिला तालुकाध्यक्ष सौ हेमलत्ता पवार यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा, सौ, शितल राजेंद्र कोंटुरवार, उपाध्यक्ष सौ पुनमताई नरेंद्र साळुंखे, सौ सुरेखाताई जाधव, सौ सुनिता शिंपी सौ, भाग्यश्रीताई चित्ते सौ हेमलत्ता पवार, सौ.संगिताताई पवार, सौ, मिनाक्षीताई पवार सौ, सारीखाताई बाविस्कर, सौ,रेखाताई गवळे सौ, ज्योत्स्नाताई सोनवणे सौ वैशाली चित्ते यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी अध्यक्षा सौ, मंगला एकनाथ जाधव, सौ भारतीताई जगताप ,व सौ आशाताई गवळे सौ.मनिषा बागुल सौ नलिनीताई जगताप, सौ आशाताई जगताप, श्रीमती मिनाताई खैरनार , सौ. कल्पना बागुल, सौ पुष्पलता संधानशिवे तसेच सर्व महीला मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य समाज महिला भगिनी उपस्थित होते तसेच यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून अ.भा.श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंध्यवंर्ती संस्थेचे संघटक प्रा. प्रकाश भांडारकर यांनी समाज संस्थेला संत शिरोमणी नामदेव महाराज व विठ्ठल रुक्मिणी चे अतिशय मनमोहक असे फोटो फ्रेम केलेले फोटो समाज अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी, यांच्याकडे सप्रेम भेट म्हणून दिले यावेळी सहसचिव श्री राजेंन्द्र कोंटुरवार माजी अध्यक्ष श्री हरीदास जगताप माजी सचिव श्री मधुकर जाधव माजी युवाध्यक्ष श्री सतिष जाधव हजर होते कार्यक्रम अतिशय सुंदर असा झाला त्यानिमित्ताने दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज कडून महिला मंडळाचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ वर्षाताई खैरनार यांनी केले शेवटी आलेल्या सर्व महिला भगीनीचे आभार प्रदर्शन सौ शितलताई कोंटुरवार यांनी केले ✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा 💐💐💐💐💐💐💐🙏*
Comments
Post a Comment