कॉम्पीटिटीव्ह सेतूबंध हॅकेथॉन स्पर्धेत नाशिकचा व सामाजिक कार्यकर्त्या सौ ललीताताई पाटील यांचा मुलगा कु.आदित्य पाटील याचा संपूर्ण भारतात पहिला क्रमांक!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
जळगाव - अखिल भारतीय स्तरावर बेंगलूरू येथील बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व्दारा कॉम्पीटिटीव्ह सेतूबंध हॅ थकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नाशिक येथील के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थी समूहाने सुयश मिळविले. या समूहाचे नेतृत्व पाचोरा येथील आदित्य कृष्णराज पाटील या विद्यार्थ्याने केले...
बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेंगलूरू या शैक्षणिक संस्थेमार्फत अखिल भारतीय स्तरावर कॉम्पीटिटीव्ह सेतूबंध हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नाशिक येथील के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए शाखेचे आदित्य कृष्णराज पाटील, अक्षय विजय सोनवणे, पल्लवी किशोरसिंग जाधव, कल्याणी बाळासाहेब ढोले-पाटील, वैशाखी भागीरथी धल, सुरभि संदीप मेटकर या सहा विद्यार्थ्यांचा समूहाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. 
के.के.वाघ महाविद्यालयाचे एमबीए विभाग प्रमुख डॉ.सरोज ढाके आणि प्रिया राखीबे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आलेल्या कॉम्पीटिटीव्ह सेतूबंध ॲकेथॉन स्पर्धेतील के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय एमबीएचा विद्यार्थी आदित्य कृष्णराज पाटील हा तरूण भारत जळगावचे उपसंपादक कृष्णराज एच पाटील आणि पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता पाटील यांचा मुलगा आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद