मुलांचे कुटुंबातील संवाद सुसंवाद असले तर व्यक्तिमत्त्वाचा विकास जलद होतो. - प्रा. डॉ. सतीष सूर्ये
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
*पाचोरा दि. 06 -* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा जि. जळगाव येथील मानसशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभाग आयोजित विद्यार्थ्यांसाठी 'विवाहपूर्व समुपदेशन' आणि 'संवाद व व्यक्तिमत्व विकास' या विषयावर दि. 04 मार्च रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सतीष सूर्ये, डॉ. नागोराव डोंगरे, प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, पुणे येथील बालभारती मानसशास्त्र अभ्यासमंडळ सदस्य डॉ. जे. पी. बडगुजर तसेच कार्यशाळा सहसमन्वयक प्रा. सुवर्णा पाटील, समन्वयक डॉ. प्राजक्ता शितोळे उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ही कार्यशाळा विद्यार्थांसाठी समुपदेशन करणारी असून आजकालच्या आधुनिक युगात लिव्ह इन रिलेशन, प्री-वेडिंग, घटस्फोटचे वाढते प्रमाण यामुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे वैवाहिक समुपदेशन ही काळाची गरज झाली आहे. ज्यातून तारुण्याच्या 'वादळी वयात' विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा अशा कार्यशाळांमधून मिळेल. विद्यापीठ व आमची संस्था विद्यार्थांच्या विकासासाठी कायमच कटिबंध आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी विद्यार्थी व कुटुंबामध्ये सुसंवाद असणे महत्वाचे आहे ज्यातून विद्यार्थी आपल्या उत्तम जीवनासाठी शिदोरी घेतील असे मत व्यक्त केले. या सत्राच्या प्रास्ताविकेत प्रा. सुवर्णा पाटील यांनी कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी तर आभार डॉ. प्राजक्ता शितोळे यांनी केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. सतीष सूर्ये यांनी 'संवाद व व्यक्तिमत्व विकास' या विषयावर मार्गदर्शन केले. मुलांचा कुटुंबातील संवाद हा सुसंवाद असेल तर व्यक्तिमत्त्वाचा विकास जलद व समृद्ध होतो. कुटुंबाची भूमिका विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्त्वाची असते असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी उत्तम संवाद कौशल्य कसे असले पाहिजे व त्यातून व्यक्तिमत्व विकास कसा खुलतो हे PPT च्या व्हिडीओ क्लिप सादरीकरणाद्वारे तसेच विद्यर्थ्यांचा प्रत्यक्ष कृतियुक्त सहभाग घेऊन व प्रश्नोत्तरांचा उपयोग करून स्पष्ट केले. या सत्रातील अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी कुटुंबात जर खेळीमेळीचे वातावरण असेल तर व्यक्तिमत्व विकास उत्तम होतो असे स्पष्ट केले. या सत्रातील प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ. प्राजक्ता शितोळे, सूत्रसंचालन डॉ. क्रांती सोनवणे तर आभार प्रा. संजिदा शेख यांनी केले.
दुसऱ्या सत्रात एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर येथील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. नागोराव डोंगरे यांनी 'विवाहपूर्व समुपदेशन' या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या स्थितीत महाराष्ट्रात 13 लाख पेक्षा जास्त जोडपी घटस्फोटीत आहेत. 'पती-पत्नीचे समर्पण म्हणजेच लग्न होय.' लग्न करण्याआधी खूप वेळ मिळतो तेव्हा सुसंवादातून विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा जेणेकरून घटस्फोटाची वेळच येणार नाही. लग्न ठरवीत असताना मुला-मुलींच्या लग्नपत्रिका जुळविण्यापेक्षा मेडिकल तपासणी करणे अधिक महत्त्वाचे वाटते असे मत त्यांनी व्यक्त केले. विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व त्यांनी कवितात्मक शैली वापरून स्पष्ट केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. जे. पी. बडगुजर यांनी विद्यार्थ्यांसाठी कुटुंब व शिक्षक हे दोन घटक अधिक महत्त्वाचे आहेत. या वयात चुका होणे सहाजिकच आहे पण हा तुमचा दोष नसून तुमच्या वयाचा दोष आहे. यासाठी कुटुंबातील सुसंवाद महत्त्वाचा ठरतो असे मत स्पष्ट केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल भोसले, प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ. प्राजक्ता शितोळे तर आभार प्रा. जयश्री वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पाचोरा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मा. सौ. ताईसाहेब सुचेताताई वाघ, तनिष्का ग्रुपच्या माजी अध्यक्षा मा. सौ. ताईसाहेब ज्योतीताई वाघ व मा. सौ. ताईसाहेब सुरेखाताई पाटील या प्रमुख अतिथी म्हणून तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी ताईसाहेब सौ. ज्योतीताई वाघ यांनी त्यांच्या मनोगतातून 'एकत्र कुटुंबपद्धती'चे महत्त्व स्पष्ट करून एकत्र कुटुंबपद्धतीमुळे वैवाहिक जीवन कसे सुकर होते हे सांगितले. उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व सकारात्मक विचारांची शिदोरी घेऊन जावी हेच या कार्यशाळेचे फलित आहे असे मत व्यक्त केले. यावेळी कु. चेतना हिरे व कु. गायत्री क्षीरसागर या विद्यार्थिनींनी कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी तर आभार प्रा. सुवर्णा पाटील यांनी केले.
याप्रसंगी डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा.अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अमित गायकवाड, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. नितीन पाटील, प्रा. लक्ष्मी गलानी, सौ. ज्योती जाधव, प्रा. किरण पाटील, प्रा. मयुरी सिनकर, प्रा. निकिता सोन्नी, प्रा. पूजा शिरूडे, श्री. नितीन पी. पाटील, श्री. ऋषिकेश ठाकूर, श्री. विजय सोनजे, श्री. उमेश माळी, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. जयेश कुमावत, श्री. सुनील नवगिरे, श्री. बी. जी. पवार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment