कवयित्री बहिणाबाई चौधरी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि अभिनव बहुउद्देशीय संस्था भडगाव पीएम उषा सॉफ्ट कॉम्पोनन्ट अंतर्गत शेतकरी सहायता उपक्रम घेण्यात आला.






(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
उपक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर आशुतोष रमेश पाटील वक्ते कृषी सहाय्यक शिंदे साहेब व अवताळे सर तसेच अभिनव संस्थेचे चेअरमन डॉक्टर दिलीप पाटील अध्यक्षा डॉक्टर सौ सुवर्णा पाटील सौ मंदाकिनी पाटील पोलीस पाटील श्री निळकंठ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत मका व गहू पिकावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव यावर कृषी तज्ञ आवताडे साहेबांनी मार्गदर्शन केले. 
पिकांना  खत पुरवठा करताना नॅनोटेक्नॉलॉजीचा त्यात सहभाग व त्याचे फायदे सांगितले.
 तसेच ड्रोन वापराने फवारणी करताना पैशाची बचत, वेळेची बचत व पाण्याची बचत कशी होते यावर मार्गदर्शन इफकोचे शिंदे सर यांनी केले.
त्यात ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. 
त्याच प्रमाणे पारंपरिक शेतीला बगल देऊन अंजीर शेती करणारे श्री भोसले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
अभिनव डीएमएलटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. 
कार्यक्रमाला श्री नेहते सर,  श्री प्रांजल सर , श्रीमती चंदा पाटील, महिमा चौधरी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री घनश्याम पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ सुवर्णा पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ दिलीप पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद