पाचोरा येथे श्री.सु.भा.प्राथमिक विद्यामंदिर येथे मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली "पर्यावरण पुरक होळी" हा उपक्रम राबवण्यात आला!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज दि.13/03/2025 गुरुवार रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली *पर्यावरण पूरक होळी* हा उपक्रम साजरा करण्यात आला....
या प्रसंगी परिपाठाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांकडून *आम्ही सर्व जण पर्यावरण पूरक होळी साजरी करू....* अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. तद्नंतर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती लक्ष्माबाई सोनवणे यांच्या हस्ते होलिकेचे पूजन करण्यात आले🔥
सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पाना - फुलांची उधळण करीत मोठ्या जल्लोषात होळी उत्सव साजरा केला..या प्रसंगी सर्वांनी आपल्या मनातले एकमेकांबद्दलचे राग,द्वेष, मत्सर ई...होळीत दहन करूया ...असे आवाहन शाळेचे शिक्षक श्री पवार सर यांनी विद्यार्थ्यांना केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले...
ता.पाचोरा जि . जळगाव 9096237788
Comments
Post a Comment