पाचोर्यात भुकंपाचे सदृश धक्के कॉग्रेस ने केली चौकशी मागणी.



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा (प्रतिनिधी) -  पाचोरा शहरातील आज दि ५ वाजेच्या सुमारास भुकंप सदृश आवाजा सह हादरे बसले याबाबत चौकशी ची कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी प्रशासनाकडे केली आहे.



पाचोरा शहरातील नागरिकांना सांयकाळी ५ वाजता मोठा आवाज होवुन खिडक्यांचे काचांचा देखील आवाज झाला. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी हा आवाजासह खिडक्यांचे कांचा देखील आवाज स्वतः अनुभवला असुन प्रशासनाने तात्काळ याबाबत चौकशी करून हा आवाज कशाचा आहे जे हादरे जाणवले ते नेमके कशाचे हे स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी करुन वाढती वृक्षतोड, दगडाच्या भल्या मोठ्या खदाणी याचा भुगर्भावर तर काही परीणाम होत नाही ना? मागच्या वेळी अशाच पद्धतीचे हादरे आणि आवाज असतांना प्रशासनाने हलक्यात घेतले मात्र यावेळी हा आवाज आणि हादरे याला हलक्यात न घेता चौकशी करावी अशी मागणी केली आहे. सायंकाळी चा आवाज आणि हादर्याची चर्चा सुरू होती. 

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद