दोंडाईचा येथे डिजिटल बँकिंग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा येथे जीतो लेडीज विंगद्वारे आयोजित डिजिटल बँकिंग जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या समारंभाची सुरुवात सुनीता झाबक यांनी नवकार मंत्र ने केली, ज्याने कार्यक्रमासाठी एक शांत आणि शुभ वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता कवाड आणि डिंपल बाफना यांनी केले.*
*कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून हस्ती बैंकचे सहा. महाव्यवस्थापक -आयटी विभागचे सुनील गर्गे सर होते. त्यानी उपस्थितांना डिजिटल बँकिंग, सायबर सुरक्षा आणि बँकिंग संकल्पनांवर आधारित सखोल माहिती दिली, तसेच डिजिटल बँकिंगच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले आणि उपस्थितांना अधिक माहितीपूर्ण डिजिटल* *अनुभव मिळवण्यास प्रेरित केले.सदर कार्यशाळेत प्रवीण राजपुरे,अरविन्द देवरे यांचेही सहकार्य लाभले.*
कार्यक्रमात हस्तीचे चेअरमन कैलास जैन यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला जाऊ शकला. डिजिटल बँकिंग क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले गेले.
कार्यक्रमाच्या दरम्यान, उपस्थित सदस्यांनी होळीच्या उत्सवाचा आनंद घेतला आणि रंगांच्या खेळात समाजातील एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या समारोपात डिंपल बाफना यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे आणि गर्गे सर यांचे आभार व्यक्त मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अध्यक्ष सुगंधा जैन, उपाध्यक्ष नम्रता कवाड आणि पूनम बाफना, सचिव हर्षा कांकरिया, संयुक्त सचिव डॉ. कल्याणी मुनोत, पूनम कर्णावट, खजिनदार सपना चतुरमुथा, संयोजक नीता कवाड आणि सह संयोजक डिंपल बाफना यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते ✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा*.
Comments
Post a Comment