फेब्रुवारी महिन्याअखेर बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संस्थेची मासिक मीटिंग ही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पाचोरा येथे संपन्न
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा:-दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी माऊली बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संस्थेची मासिक मीटिंग ही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र एम.एम. कॉलेज जवळ, लीलावती हॉस्पिटल जवळ या ठिकाणी माननीय आप्पासाहेब राजाराम नागो सोनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली नवीन ज्येष्ठ नागरिक सभासदांचा सत्कार यावेळी करण्यात आला .तसेच ज्या सभासदांचे वाढदिवस फेब्रुवारी महिन्यात येतात त्यांचा सुद्धा सत्कार शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला त्यामध्ये श्री अरुण नारायण जोशी,श्री दत्तात्रय सिताराम पाटील,श्रीमती सुलोचना पांडुरंग माळी,गोविंद झेंडू पाटील, पुरुषोत्तम जाधव सर, प्राध्यापक दिलीप बंधू वाणी सर यांचा समावेश होता त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अमर संजीवनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कजगाव येथील सचिव श्री बी .के.पाटील सर,संचालक राजेंद्रसिंग बाबुलाल पवार तसेच विक्रम कौतिक महाजन, गोविंदा सखाराम महाजन, पृथ्वीराज हरी पाटील इत्यादी सभासद यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर श्रीमती सुलोचना पांडुरंग माळीताई यांनी अहिराणी गीत अतिशय हसत खेळत वातावरणात सादर केले. अहिराणी गीताचे नाव होते *शेतकरी* *राजा भोया.* त्यानंतर मुख्याधिकारी साहेब नगरपालिका पाचोरा श्री मंगेश देवरे साहेब यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेने करण्यात आली.नवीन वास्तू ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र या ठिकाणी कलश पूजन श्री के.एस. महाजन सचिव व त्यांच्या अर्धांगिनी यांनी कलश पूजन केले कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली.नवीन सभासदांचा सुद्धा यावेळी स्वागत करण्यात आले आप्पासाहेब श्री राजाराम नागो सोनार अध्यक्ष यांचे चिरंजीव श्री प्रमोद राजाराम सोनार यांना उत्कृष्ट शिलेदार उद्योजक म्हणून जळगाव या ठिकाणी लोकमत तर्फे सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा सत्कार सचिव श्री के.एस.महाजन सर यांनी केला. ज्येष्ठ नागरिक संघ तसेच अध्यक्ष आणि सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले काही ज्येष्ठ नागरिकांनी मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब यांना आपल्या विरंगुळा केंद्रात असलेल्या त्रुटी अडचणी सांगितल्या, साहेबांनी सर्व अडचणी पाणीपुरवठा पासून इलेक्ट्रिक सप्लाय पर्यंत आणि लायब्ररी इत्यादी उपलब्ध करून देणे इत्यादी कामे सर्वकाही सुख सोयी ज्येष्ठ नागरिकांना पुरविल्या जातील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव के. एस. महाजन सर यांनी केले तसेच अध्यक्ष श्री राजाराम नागो सोनार यांनी विनोदी शैलीने विनोद सांगून सर्वांना खीळवून ठेवले त्याचप्रमाणे श्री पी. एम. जाधव सर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार श्री प्रकाश विसपुते सर यांनी विनोदी पद्धतीने जोक सांगून सर्वांना हसत खेळत ठेवले. सर्वांनी चहा पानाचा आस्वाद घेतला ,अशा पद्धतीने खेळी मेळीच्या कार्यक्रमात सदरील मीटिंग समाप्त झाली. शेवटी कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला.
Comments
Post a Comment