लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळ तर्फे 8 मार्च महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा): लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळ पाचोरा तर्फे उद्या दिनांक 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्री ही केवळ एक कुटबाचा आधार नसुन तर समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाचे शिल्पकार आहेत. या महिला दिनानिमित्त 70 ते 75 वयोगटातील महिला मंडळाचे सभासद असणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ होणार असून समाजातील महिलाकरिता महिला फॅन्सी ड्रेस स्पर्धा व विविध खेळ घेण्यात येणार हा कार्यक्रम दिनांक 9 मार्च 2025 रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित केला आहे.तसेच प्रवेश फी ही 25 रु ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे ठिकाण रेणुका माता मंदिर,कृष्णाजी नगर भडगाव पाचोरा तरी या कार्यक्रमासाठी समाजातील महिलांनी जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी अशी विनंती लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment