4 मार्च रोजी देशमुखवाडी पाचोरा येथील श्री.सु.भा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे अंतर्गत काकणबर्डी या तीर्थक्षेत्राला भेट..!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था द्वारा संचलित श्री.सु.भा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे आज  दिनांक 04/03/2025 रोजी क्षेत्रभेट अंतर्गत काकणबर्डी या तीर्थक्षेत्राला भेट देऊन विध्यार्थ्यांना त्या ठिकाणाची सर्व माहिती शाळेचे जेष्ठशिक्षक श्री नारायण सोनवणे सर, सौ वर्षा मॅडम आणि श्रीमती रुपाली पाटील मॅडम यांनी  खुप छान पद्धतीने समजावून सांगितली तसेच  सामूहिक कालभैरवाष्ठक म्हटले येळकोट येळकोट जयमल्हार🚩 सदानंदाचा येळकोट आणि नवरी नटली या गाण्यावर विदयार्थ्यांनी खुप छान नृत्य केल. त्यानंतर जवळच असलेल्या जोगेश्वरी रिसॉर्ट मध्ये विध्यार्थ्यानी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्याठिकाणी असलेल्या बगीच्यात विद्यार्थ्यानी मनसोक्त आनंद घेतला...
या क्षेत्रीय भेटीचे नियोजन श्रीमती रुपाली पाटील श्री नारायण सोनवणे श्रीमती सीमा भदाणे, श्रीमती वर्षा पाटील या सर्व शिक्षकांनी केलेलं होतं हीं सहल यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंके मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद