आज दिनांक 15 मार्च 2025 शनिवारी डॉ विशाल पाटील यांच्या नवीन चिंतामणी हाॅस्पिटल स्थलांतर सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा)शहरात गेल्या दहा वर्षांपासून रुग्ण सेवा देणारे डॉ.विशाल पाटील यांनी अनेक रुग्णांना जिवदान दिले आहे.
आता त्यांनी स्वताचे चिंतामणी हॉस्पिटल ची भव्य इमारत उभारली असून.या वास्तुचे उद्घाटन पाचोरा भडगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील,यांचा सह माजी आमदार दिलीप वाघ, निर्मल सिड्सचा संचालिका सौ वैशालीताई सुर्यवंशी,तसेच भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, पाचोरा नगरपरिषद माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, पोलिस काॅ. आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंतामणी हॉस्पिटल चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या समयी पाचोर्यातील सर्व डाॅक्टर्स पत्रकार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा.डॉ. सतीश‌ व्यं. टाक सर,मा.डाॅ. अमित साळुंखे सर, डॉ सहाय्यक डॉ नितीन तायडे यांनी नवीन वास्तु स्थलांतर निमित्ताने डॉ विशाल पाटील व त्यांच्या पत्नी डॉ सौ प्रियंका पाटील यांना भरभरून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विशेष सहकार्य म्हणून, डॉ.भुषण मगर, डॉ.नरेश गवांदे यांचे लाभले आहे,
या उद्घाटन सोहळा प्रसंगी मानेवर मोठ्या संख्येने उपस्थित होते  चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल सुरेश पाटील यांनी मानेवराचे आभार मानले 
या चिंतामणी हाॅस्पिटल चे नवीन स्थलांतर ठिकाण हे सहकारी शिक्षण संस्था संचलित 
श्री.सु.भा.पाटील विद्यामंदिर देशमुख वाडी समोर पाचोरा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद