14 मार्च शुक्रवारी रात्री सातगाव डोंगरी येथे रानडुक्कराचा शेतकरी वर हल्ला

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा तालुक्यातील सातगांव डोंगरी येथील शेतकऱ्यांवर रानडुक्कराने हल्ला केल्याची घटना दिनांक 14 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
रात्री एक वाजेची लाईट असल्यामुळे शेतात पाणीचा भरणा करण्यासाठी शेतकरी शुभम कैलास परदेशी वय 23 वर्ष राहणार सातगांव डोंगरी हा तरुण साडेनऊच्या सुमारास रस्त्याने पायी चालत जात असतांना शुभम वरती रानडुक्कर ने हल्ला केला यात शेतकरी शुभम परदेशी जखमी झाले असता, पाचोरा ग्रामिण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, शेतकरी शुभम परदेशी यांचा डावा हात फॅक्चर तर उजवा हातास जबर मार लागल्याने ते जखमी झाले आहेत.
वनविभागाच्या वतीने मदत मिळावी अशी मागणी शुभम परदेशी यांनी यावेळी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद