भाजपा पाचोरा यांच्या वतीने अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील महाविजयाचा जल्लोष



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
           दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने अभुतपूर्व यश संपादन केले असून तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार याचा देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा यांच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील अटल भाजपा कार्यालय येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.आणि घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
        याप्रसंगी भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका सरचिटणीस तथा माजी सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील,भाजपा शहराध्यक्ष दीपक माने,भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजू दादा पाटील,सरचिटणीस समाधान मुळे,जगदीश पाटील,गिरीश बर्वे,अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष रहीम बागवान,शहराध्यक्ष टिपू देशमुख,प्रदीप पाटील,रोहन मिश्रा,सोहम मोरे यासह आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद