माऊली फाऊंडेशन च्या वतीने न.प.कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
माऊली फाउंडेशन च्या वतीने न. विभागाच्या क्रीडा धोरणांतर्गत नाशिक विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन राहुरी जि. अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना भडगाव नगर परिषदेच्या रस्सीखेच महिला संघाने प्रथम क्रमांक, समूह गीत गायन स्पर्धेत पुरुष संघाने प्रथम क्रमांक व गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. विभागीय पातळीवर या कर्मचाऱ्यांनी भडगाव चे नाव उंचावल्याने माऊली फाउंडेशन भडगाव यांनी भडगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम भडगाव नगरपरिषद कार्यालयात  आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व खेळाडूंना राज्यस्तरावर उज्वल यश संपादन करावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
      सदर कार्यक्रमातमाऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगीता जाधव, हाजी जाकीर कुरेशी, माऊली महाराष्ट्र टीम  अध्यक्ष योगेश शिंपी, उपाध्यक्ष प्रतिभा कुलकर्णी, रवींद्र कुळकर्णी, प्रवीण पाटील संजय सोनार, देवेंद्र पाटील, मनीषा पाटील यांच्यासह नगरपरिषदचे  मा. मुख्याधिकारी श्री.रवींद्र लांडे, प्रशासकीय अधिकारी श्री पंकज सूर्यवंशी, श्री.नितीन लोखंडे, श्री.साळुंखे यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद