पाचोरा येथील लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळ तर्फे मकर संक्रांति निमित्त समाजातील महिलांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी विविध स्पर्धा घेऊन जिंकलेल्या स्पर्धकांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ संगीता ताई वाणी यांनी आपल्या अकरा महिलांचा ग्रुप तयार करून त्या महिलांना एकसंघ करून त्यांचे विचार व सर्वांचे एकत्रित बैठक घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात यावेळी त्या प्रत्येक महिलाला मान सन्मान देत असतात त्यांनी त्यांच्या मंडळाच्या मार्फत अनेक चांगले उपक्रम महिलांकरता राबवून महिलांना प्रोत्साहन करीत असतात तसेच महिलांना मार्गदर्शन करताना सांगतात महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा उद्योग करावा महिलांनी घरकाम करून इतरही व्यवसायात व उद्योगात तसेच बचत गटामार्फत अनेक छोटे-मोठे व्यवसाय करावे असे अनेक मार्गदर्शन ते करीत असतात तसेच महिलांसाठी महिलांचे होणारे सणांचे सुद्धा ते कार्यक्रम घेत असतात तसेच त्यांच्या मंडळामार्फत ते दरवर्षी मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू चा कार्यक्रम घेत असतात महिलांनी घराबाहेर पडावे व आपणही मागे नाही यासाठी समाजातील होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यावे असे सुचक नेहमी ते मांडत असतात त्यांच्या ग्रुप मधील असलेल्या सर्व महिला या सर्व शिक्षित असून अभ्यासू व योग्य मार्गदर्शन घेत असतात त्यामुळे त्या महिला मंडळामार्फत विविध कार्यक्रम व विविध स्पर्धा ठेवत असतात मकर संक्रांतीनिमित्त त्यांनी यावर्षी महालपुरे येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाचोरातील प्रसिद्ध डॉक्टर सौ शितल मुकुंद सावनेरकर व समाजसेविका सौ सुप्रिया सचिन सोमवंशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महिला मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारणी उपस्थित होते यावेळी डॉक्टर सौ शितल सावनेरकर यांनी समाजातील महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले महिलांनी वेळोवेळी आपली शरीराची काळजी घेतली पाहिजे आपण तंदुरुस्त तर परिवार दुरुस्त तसेच वयात आलेल्या मुलींनी आपल्या त्वचेची काळजी घ्यावी आहार वेळेवर करावा व्यायाम करावा सकाळी फिरण्यास गेले तर अधिक उत्तम तसेच सौ सुप्रिया सोमवंशी यांनी महिलांनी आपले संरक्षण कसे करावे यावर मार्गदर्शन केले यानंतर कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली हे गीत *सोनाली चिंचोरे* यांनी सादर केले कार्यक्रमाचे रूपरेषा महिला मंडळ अध्यक्ष *सौ संगीता ताई वाणी* यांनी केले यानंतर समाजातील महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये महिलांनी उस्फूर्तपणे भाग घेतला यावेळी एक मिनिट स्पर्धा. *उखाणे* संगीत खुर्ची. असे अनेक चांगले उपक्रम महिलांसाठी घेण्यात आले या स्पर्धेमुळे महिलांचा *व्यायाम* सुद्धा झाला या कार्यक्रमाचे प्रायोजक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री *सुभाष दादा नावरकर* हे प्रायोजक होते तसेच यावेळी महिला मंडळाला *सौ रूपाली दुसे* यांनी अकराशे रुपये मदत देऊन एक चांगले योगदान दिले या कार्यक्रमाची शोभा *सौ स्वाती शिरोडे* यांनी कालिका नृत्य सादर करून सर्व महिलांना आकर्षित केले त्यांनी हुबेहूब *कालिका *देवीचे रूप प्रगट* केले होते त्यामुळे महिलाही एकदम चकित झाल्या होत्या हा कार्यक्रम उत्साह पूर्ण झाल्यामुळे समाजातील महिलाही आनंदी झाल्या यावेळी स्पर्धा मध्ये जिंकलेल्या महिलांना *बक्षीस* देऊन गौरविण्यात आले होते तसेच *सौ संगीता ताई वाणी यांची महाराष्ट्र प्रबोधिनी मंडळाच्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल* उन्नती महिला मंडळ कार्यकारणी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी सौ सविता ताई चिंचोले. आशाताई कोतकर. सौ मनीषा ताई येवले. सौ चारुशीला येवले. सौ सुनीता येवले. सौ वैशाली तरटकर. सौ संध्या ब्राह्मणकर. सौ विद्या कोतकर. राधिका येवले. यांनी सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केले सूत्रसंचालन *सौ अनघा येवले* त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने केली की त्या कार्यक्रमाची शान वाढवली सर्व कार्यक्रम एका बाजूला व सूत्रसंचालन एका बाजूला सूत्रसंचालन व्यवस्थित तर संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित त्यामुळे *सौ अनघा येवले* यांनी सूत्रसंचालन उत्तम प्रकारे केले त्यामुळे त्यांना समाजातील महिलांनी ही खूप प्रतिसाद दिला व त्यांचे कौतुक व अभिनंदन केले
Comments
Post a Comment