अहीर स्वर्णकार मंडळातर्फे नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
अहीर स्वर्णकार मंडळातर्फे नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा.!
 १५ फेब्रुवारी २०२५:
अहिर स्वर्णकार मंडळ, अहिर महिला मंडळ आणि अहिर युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १५ फेब्रुवारी २०२५) नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी सुवर्णकार मंडळ, हिंद रोड येथील विठ्ठल मंदिर रोड, गांधी चौक, सोनार गल्ली, देशमुख वाडी मार्गे पालखीचे प्रस्थान झाले. या सोहळ्यात, विविध वयोमानाचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी सोहळा सुवर्णकार मंगल कार्यालयात पोहोचल्यानंतर, महाराजांची आरती करण्यात आली.

या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात, महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात रक्त तपासणी (Blood Test) करण्यात आली. या सामाजिक उपक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

या सोहळ्यात सुमित किशोर पाटील यांच्यासह, विविध मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद