श्री छत्रपति शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव मार्फत बांबरूड़ राणीचे(पाचोरा) येथे मोफत हृदय रोग,नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
बांबरूड़ राणीचे(पाचोरा) येथे श्री छत्रपति शाहू महाराज हॉस्पिटल तर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत हृदय रोग आणि नेत्र तपासणी शिबिर दि. 10/2/2025 रोजी वेळ सकाळी 10:00 ते दु 2:00 वाजेपर्यंत ग्राम पंचायत कार्यालय येथे शिबिर संपन्न झाले.शिबिरात अनुभवी डॉक्टर यांचे मार्गदर्शनासह प्राथमिक तपासणी करण्यात आली. शिबिरात गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच गावातील ग्राम पंचायत सदस्य मनोज वाघ पिंटू दारकोंडे,उपसरपंच प्रदीप वाघ,बुरहान तडवी, भागवत शेवगे, सुनील पाटील तसेच डॉ.कृष्ण वाघमारे,डॉ.चंदन चौधरी,डॉ.सोहेब पटेल, दिगंबर वाघ,पी.आर.ओ. - सचिन श्रावण, ब्रदर रितेश पाटील, आरोग्य मित्र- सागर राणे वार्डबॉय-सागर मसाने, सिस्टर- सपना आठळे, सिस्टर- राजेश्वरी गायकवाड़, सिस्टर -- हर्षा ननावरे या डॉक्टर टीम चे भरपुर सहकार्य लाभले.तसेच गावातील ग्राम पंचायतमधील कर्मचारी पुरुषोत्तम वाघ, गजानन वाघ, दूर्वास कोळी, ग्राम पंचायत सिपाई सागर टिटवे यांचे भरपूर सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment