आज हरे.पिंपळगाव येथील कर्णबधिर विद्यालयात राजश्रीताई येरुळे यांच्या वाढदिवसासह ॲड .कविता मासरे (रायसाकडा)मॅडम सन्मानित...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
हरे पिंपळगाव(पाचोरा)
आज दि. 2/1/2025 गुरुवार रोजी माजी विद्यार्थी संघ संचलित,मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव(हरे.) येथे कर्णबधिर मुलांसोबत मा. श्री. धनंजय येरुळे साहेब (DYSP) पाचोरा पोलीस कार्यालय, यांच्या धर्मपत्नी सौ. राजश्रीताई येरुळे यांचा 51 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज ताईंचा वाढदिवस त्याचबरोबर “ महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन ” हा दुग्धशर्करा योग घडून याशुभसंगी नुकतीच वकील संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांची धर्मपत्नी ॲड कविता मासरे (रायसाकडा) मॅडम यांची "उपाध्यक्ष" पदी बिनविरोध निवड करण्यात आली. याच अनुषंगाने लोहारा ता.पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकारी अण्णा बेलदार यांनी त्यांना आमंत्रित करून सर्व मान्यवरांनी सन्मानित केले, याप्रसंगी सौ. राजश्री ताईंना माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी माननीय श्री. पी. बी. पाटील साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच डिवायएसपी धनंजय येरुळे सर, सर्जेराव क्षीरसागर सर (API) पिंपळगाव हरेश्वर, पोलीस कर्मचारी – राहुल बेहरे, सागर पाटील, ऋषिकेश सोनवणे,अजयसिंग राजपूत,अमोल पाटील तसेच सौ.कविता रायसाकडा ( उपाध्यक्ष वकील संघ पाचोरा) किशोर रायसाकडा ( अध्यक्ष उ.म. पत्रकार संघटना ) समाजसेवक श्री. अण्णा बेलदार, श्री. गणेश माळी- लोहारा, श्री. आनिल येवले- (ज्येष्ठ पत्रकार), राजेंद्र खैरनार (पाचोरा शहराध्यक्ष म.रा.पत्रकार संघ, भिकनभाऊ पाटील(पत्रकार), दिपक मुलमुले(पत्रकार), ईसा तडवी(पत्रकार), चंद्रकांत मोहोर(पत्रकार), परदेशी सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक गरुड हायस्कूल लोहारा, आदींनी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त श्री. धनंजय येरुळे साहेब यांनी विद्यालयातील मुलांना मिष्ठान्न भोजन दिले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment