भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकामगार महासंघाची बैठक संपन्न.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज  13/01/2025 रोजी बांधकामगार महासंघाची बैठक जळगाव येथे आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
    बांधकाम कामगारांना नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणी समस्या तसेच पेंडिंग विषयाबाबत चर्चा करण्यात आली.तसेच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सदाशिव सोनार यांनी माननीय आयुक्त साहेब मा. राजु. दे. गुल्हाणे. यांना कामगारांच्या समस्या मांडल्या तसेच आयुक्त साहेबांनी कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले. 
    मीटिंग साठी जिल्ह्याभरातून प्रत्येक तालुक्यातून जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते तसेच पदाधिकारी देखील उपस्थित होते. प्रवीण मिस्तरी जिल्हाध्यक्ष. सुनील कोळी जिल्हा सचिव. प्रवीण शिरसाट सहसचिव. आनंद कोळी कार्यकारणी सदस्य. संजय शिरसाट. सुनील कोळी बांबरुड तालुका सचिव. राजेंद्र खैरनार कार्यकारणी सदस्य. रेवानंद सुतार. तसेच घरेलू महिला देखील उपस्थित होते. रत्‍नाबाई पाटील. शमीम शेख. छायाबाई गवळी. 
      आयुक्त साहेबांना संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन मीटिंग संपन्न करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद