पाचोरा नगरपालिकेतील पहिल्या दिवशीच्या व्याख्यानमाल्यात प्राचार्य जावेद पाशा यांच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील नगरपालिकेतर्फे गेल्या साठ वर्षापासून सुरू असलेली व्याख्यानमालाचे परंपरा आजही थंडीच्या जोरात उत्साहात असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे नागपूर येथून आलेले व्याख्याते श्री जावेद कुरेशी यांनी आपल्या कथा व व्याख्याद्वारे नागरिकांना भारतीय संविधान सन्मान जनक असून नागरिकांनी त्यांचा आदर केला पाहिजे तसेच सुरक्षा अमलबजावणी केली पाहिजे तसेच यावेळी पाचोराचे प्रांत अधिकारी श्री भूषण अहिरे साहेब यांनी पाचोरा नगरपालिकेने सुरू केलेली प्रथा व्याख्यानमालयाची साठ वर्षापासून चालू असून खरोखर त्याचे अभिनंदन केले तसेच नागरिकांनीही व्याख्यानमालाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा कारण व्याख्यानमालामध्ये बुद्धिमत्ता व विशेष माहिती प्राप्त होते यावेळी पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी आपल्या दोन शब्दात सांगितले व्याख्यानमालाही काळाची गरज असून या माध्यमातून जगाची माहिती आपल्यासमोर मिळत असते तसेच यावेळी मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे साहेब यांनी आपल्या मनोगत मध्ये आलेल्या सर्व नागरिकांची व आलेले पाहुणे मंडळी यांचे आभार मानले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक श्री ललित सोनार व नगरपालिकेचे लायब्ररी प्रमुख श्री श्याम ढवळे यांनी केले यावेळी शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment