पाचोरा तालुक्यातील भोजे येथे एक दिवशीय सहायता कार्यशाळा संपन्न..


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा तालुक्यातील भोजे येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
PM USHA SOFT _ component अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग ,राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव हरेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने
"एक दिवशीय शेतकरी सहायता कार्यशाळा' भोजे गावामध्ये आयोजित करण्यात आली होती. 
प्रमुख मार्गदर्शक लीलाधर देशमुख (कृषी सहाय्यक पाचोरा)
यांनी प्रशासकीय योजना विषयक तसेच, पोखरा योजना 
शेतकरी गट निर्मिती तसेच 
जमिनीची पत सुधारण्यासाठी, नियमित माती परिक्षण 
कृषी गट तयार करणे ची गरज इ. विषयवार मार्गदर्शन केले. 
तसेच शैलेश अरुण पाटील यांनी 
 मोसंबी केळी विषयक मार्गदर्शन   केले.
मोसंबी पिक घेताना घ्यावयाची काळजी. 
मोसंबी पिकाला गांडूळ खताचा वापर करणे. जीवामृत दशपर्णी निमार्क त्याचा वापर केला जातो. त्यामुळे मोसंबी वर येणारी रोगराई थांबवता येते
केळी लागवडी पासून विविध जैविक खते तथा दर्जेदार उत्पन्न घेतल्यावर प्रत्यक्ष केळी विक्री साठी मार्केट प्राप्त करणे इ. विषयावर सखोल मार्गदर्शन यावेळी केले. सदर कार्यशाळेत भोजे गावातील शेतकरी यांच्या मनातील विविध प्रश्नोत्तराचे समाधान देखील झाले. शेवटी अशा कार्यशाळा विषयक माहिती संस्थे मार्फत आम्हाला कळवावी. ही मागणी सर्व शेतकरी बांधवांनी केली. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने  शेतकरी उपस्थित होते . 
कार्यशाळा सूत्रसंचालन सचिन खैरे तसेच आयोजन व नियोजन प्रसाद लोखंडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद