पाचोरा शहरातील बोहरा समाजाकडून आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार संपन्न !!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील बोहरा समाज हा अत्यंत कष्टाळू व मेहनती असून व्यापारी क्षेत्रात ते अत्यंत चाणक्य व बुद्धिवान असून ते सर्व गिऱ्हाईकांशी प्रेमाने बोलत असतात तसेच योग्य सन्मान व मान देत असतात त्यामुळे बोहरा समाज हा अत्यंत सोज्वळ आहे अशी त्यांची प्रतिमा असून कुठल्याही ग्राहकाशी वाद-विवाद न करता अगदी प्रेमाने त्याच्याशी वागून आपला व्यवसाय करीत असतात तसेच राजकारणात सुद्धा सर्वांशी एकरूप असून सर्वांशी हितसंबंध जपत असतात ते आपल्या समाजाकरिता राजकीय नेत्यांकडून जेवढे काही चांगले काम करता येतील ते मंजूर करून घेत असतात नुकतेच नवनिर्वाचित तिसऱ्या वेळेस निवडून आलेले आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचा त्यांनी समाजातर्फे सत्कार केला यावेळी माजी नगराध्यक्ष श्री संजय भाऊ गोहिल व माजी उपाध्यक्ष श्री बंडूभाऊ चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला तसेच यावेळी बोहरा समाजातील सर्व प्रतिष्ठित व व्यापारी उपस्थित होते यावेळी आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी बोहरा समाजाचे कौतुक करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले
Comments
Post a Comment