इस्कॉन च्या वतीने भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण.


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
इस्कॉन च्या वतीने भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे बक्षीस  व प्रमाणपत्राचे वितरण.
पाचोरा प्रतिनिधी: भगवद्गीता हे भारतीय संस्कृती आहे ती शालेय व विद्यालयीन
विद्यार्थ्यांत पर्यंत पोहोचवावी या हेतूने आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृतसंघ इस्कॉन पाचोरा श्री श्री मंदिर यांच्या तर्फे डिसेंबर महिन्यामध्ये भव्य भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्याचे बक्षीस वितरण रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी इस्कॉन जळगाव चे अध्यक्ष श्रीमान चैतन्य जीवन प्रभू पार्थसारथी प्रभू जगन्नाथ रथयात्रा प्रभू साधू कृपाप्रभू कृष्ण नाम प्रभू भक्तवत्सल नेताय प्रभू व रमेश जी मोर  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या परीक्षेमध्ये एकूण 1375  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. पाचोरा तालुक्यातून  एकूण 32 शाळांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. एकूण तीस हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह यांचे वाटप करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ही एक शुद्ध आध्यात्मिक शैक्षणिक तसेच  सांस्कृतिक संस्था आहे. ही संस्था स्वामी प्रभुपाद यांनी 1966 साली
अमेरिका येथे स्थापन केली. या संस्थेत त्या निमित्ताने संपूर्ण जगामध्ये
श्रीमद्भागवत ,श्रीमद्भगवद्गीता यांच्या आधारे प्रचार करणे हा या
संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर बालक व तरुण यांच्यापर्यंत
भारताचा आध्यात्मिक वारसा प्राचीन संस्कृती व नीतिमूल्य पोहोचविण्याचे
कार्य ही संस्था करत आहे. या कार्यासाठी इस्कॉन मध्ये अनेक स्तरातून
आलेले उच्च पदवीधर कुशाग्र बुद्धी मान प्राप्त असे स्वयंसेवक सेवाभावी
वृत्तीने कार्य करीत आहे. दरवर्षी इस्कॉन बालकांसाठी व तरुणांसाठी
सांस्कृतिक मूल्य पोहोचविण्यासाठी विविध चर्चासत्रे स्पर्धा व
कार्यशाळेचे आयोजन करत असते. भारताची परंपरा व संस्कृती द्वारे भारत हा
जगातील एक महासत्ता बनू शकेल.
महात्मा गांधी, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, अल्बर्ट आईन्स्टाईन, न्यूटन,
डॉक्टर राधाकृष्णन, इत्यादी थोर महापुरुषांनी भगवद्गीतेला आपले
मार्गदर्शक मानले असून त्यांचा देश के आदर्श घेऊन आम्ही भगवद् गीतेवर
आधारित प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केलेले आहे. या भगवद्गीतेवर आधारित
प्रज्ञाशोध परीक्षेतून आत्मविश्वास थोरांचे गुण पद्धतशीर गीतेचा अभ्यास
आणि थोरांना पालकांना व समाजात आदर देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा
मिळेल. समाजातील अनेक तरुणसमाजविघातक प्रवृत्तींना बळी पडून नशापान करणे
जुगार खेळणे वेश्यागमन करणे आधी घृणास्पद कृत्य करीत आहेत यामुळे
उद्विग्नता एकाग्रतेचा व चारित्र्याचा अभाव चोऱ्या दंगली व
आत्महत्येसारख्या घटना वाढत आहेत. विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवणे
मानवी निती मूल्ये आत्मसात करणे. स्वयंशिस्त पाळणे व विश्व बंधुत्वाची
भावना प्रेरित करणे ,भगवद्गीतेला जीवनात आत्मसात करण्यासाठी प्रेरित
करणे.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटामधून प्रथम पारितोषिक, अनु ज्ञानेश्वर सपकाळ .इयत्ता सहावी  ,श्री पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालय ,पाचोरा.द्वितीय पारितोषिक कृष्णा प्रवीण चौधरी ,द वर्ल्ड इंग्लिश स्कूल पाचोरा इयत्ता पाचवी. तृतीय पारितोषिक ईश्वरी हर्षल जोशी इयत्ता सहावी ,श्री गो. से हायस्कूल पाचोरा, व उत्तेजनार्थ पारितोषिक मिताली सुभाष सूर्यवंशी इयत्ता सातवी गुरुकुल इंग्लिश मीडियम शेंदुर्णी व आर्यन योगेंद्र पाटील शिंदे इंटरनॅशनल स्कूल इयत्ता पाचवी तसेच आठवी ते दहावी या गटामधून प्रथम पारितोषिक अनुष्का किरण चौधरी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी द्वितीय पारितोषिक कु. राधिका जितेंद्र पाटील गुरुकुल इंग्लिश मीडियम पाचोरा इयत्ता आठवी, तृतीय पारितोषिक कृष्णाली दिनेश पाटील आदर्श कन्या विद्यालय, भडगाव इयत्ता नववी.व उत्तेजनार्थ व्यंकटेश सुनील गवळी निर्मल इंटरनॅशनल स्कूल इयत्ता नववी व अथर्व नंदकिशोर पिंगळे न्यू भुराणी इंग्लिश स्कूल पाचोरा ,इयत्ता नववी
यांना अनुक्रमे रोख रक्कम 5000 रुपये, 4000 रुपये, 3000 रुपये ,2000  रुपये , 1000  रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह देऊन व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

  त्याचबरोबर शालेयस्तरीय बक्षिसांचे वाटप व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अशी माहिती भगवत गीता प्रज्ञाशोध परीक्षा प्रमुख श्रीमान कृष्ण नामदास यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद