महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगाव जिल्हा ६ जानेवारी २०२५ सोमवारी "पत्रकार दिन"व "रस्ता सुरक्षा सप्ताह" निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्यातर्फे दर्पण पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळा...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगाव जिल्हा
६ जानेवारी पत्रकार दिन व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्यातर्फे दर्पण पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळा...

प्रति,
महोदय,
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या चौथ्या स्तंभाचा म्हणजेच पत्रकारितेचा उपयोग समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच अन्यायाविरुध्द केल्यास खऱ्या अर्थाने पत्रकारितेतून समाजसेवा करता येते असे आम्ही मानतो.

पत्रकारितेचे बदलते स्वरूप, पत्रकारितेतील आव्हाने, प्रिंट मिडिया समोरील आव्हाने स्विकारत पत्रकार बातमीदारी करतांना व्रतस्थपणे समाजासाठी वाहून घेतांना दिसतो, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जोपासून सामाजिक बदलाची नांदी ठरावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतांना दिसतो. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडापासून ते आजपर्यतच्या पत्रकारितेने एक नवे आयाम निर्माण केले आहे. या कालखंडात अनेक पत्रकारांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पत्रकारांच्या कार्याची नोंद व्हावी यासाठी ६ जानेवारी म्हणजेच पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही पत्रकार, छायाचित्रकार तसेच इलेक्ट्रानिक माध्यमातील प्रतिनिधी यांना 'दर्पण' पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ते या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बांधवाना हेल्मेट वितरित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध वक्ते लोकमतचे संपादक मा. श्री. संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तरी आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याकरिता सादर निमंत्रित आहात.

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद