वाचन,मनन,चिंतन या त्रिसूत्री तंत्राने आदर्श विद्यार्थी घडतात प्रा. सुरेश कोळी
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
कोळगाव - "आधुनिक साधनां मुळे विद्यार्थी वर्गाचे वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे त्यासाठी मुलांनी महाविद्यालयीन ग्रंथालयाचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आपल्या मेंदूचा विकास व वापर करायचा असेल तर आवडीच्या पुस्तकांचे वाचन, स्वातंत्र्य विरांची यशोगाथा, संतांचे चरित्र व योगदान,गड किल्ल्यांची माहिती, विविध आकडेवारी लक्षात ठेवणे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकांचे चिंतन, मनन,वाचन केल्यास सर्वांगीण व्यक्तिमत्व घडते ",असे मार्गदर्शन पर विचार प्राध्यापक सुरेश कोळी यांनी मांडले ते ग्रंथालयातील वाचन कक्षाचे उद्घाटन करताना म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एल. जी. कांबळे होते. यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते रवींद्र पाटील देखील उपस्थित होते
कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव, महाविद्यालयात महाराष्ट्र शासनातर्फे वाचन संकल्प अभियान अंतर्गत वाचन संकल्प विकास कार्यशाळेच्या ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन भडगाव महाविद्यालयाचे ज्येष्ठ माजी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुरेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचे पुस्तक वाचन करण्यासाठी देण्यात आले यावेळी ग्रंथपाल श्री मनोज पवार यांनी ग्रंथालयातील ग्रंथ संपदा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दत्तात्रय पंढरीनाथ भोसले यांनी केले सूत्रसंचालन प्रा. प्रेमचंद चौधरी तर आभार प्रा. मनीषा बोरसे मॅडम यांनी केले यावेळी प्रा. प्रशांत पाटील, प्रा.संदीप बाविस्कर, प्रा.मनोज पवार ,प्रा.मनीषा बोरसे मॅडम प्रा.प्रविणा पाटील मॅडम उपस्थित होते यावेळी कला व विज्ञान व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment