बनावट दस्तऐवज तयार करुन प्लॉट खरेदी करुन ग्राहकाची फसवणुक करणा-या टोळीचा पर्दाफाश मुख्य सुत्रधारास अटक पाचोरा---- पोलीसांची कारवाई
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
श्री सतेज सखाराम भारस्कर वय ५२ सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचे फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४७१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (३), ३३६(४),३३७,३३८,३४०,३(५) सह भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ प्रमाणे १) शितल सुनिल कुमार पाटील नावाने एक तोतया महिला २) एक अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष ३) पुंडलीक काशिनाथ पाटील ४) अक्षय आधार बडगुजर याचे विरुध्द दिनांक २२/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल होता.
यातोल आरोपी मा. यांनी संगनमत करुन जारगाव शिवार येथील गट नंबर १३४/२ प्लॉट नं. ९ क्षेत्रफळ १८०.०० चौ.मी चे मुळ मालक सौ शितल सुनिलकुमार पाटील यांचे नावाचे बनावट आधारकार्ड वापरुन मुळ मालकाऐवजी दुसरी महिला उभी करुन सह दुय्यम निबंधक कार्यालय पाचोरा येथे बनावट आधारकार्ड खरे म्हणून वापरुन दस्त क्रं. ६९५७/२०२४ तयार करुन २,८५०००-०० रुपये किंमतीला नगराज गोर्वीदा आहिरे यांना खरदेखीत करुन शासनाची व मुळ मालक सौ. शितल सुनिल कुमार पाटील तसेच नगराज गोवींदा अहिरे यांची फसवणुक करुन यातील मुख्य सुत्रधार आरोपी एक अनोळखी पुरुष वय ३० ते ३५ वर्ष हा गुन्हा केल्यापासुन फरार होता.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कवीता नेरकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय वेरुळे, मा. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मागदर्शनाखाली तपास करीत असतांना यातील मुख्य आरोपी एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ३० ते ३५ हा पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने असतांना जारगाव चौफुली ता. पाचोरा येथे त्यास पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे व चुकीचे नावे सांगीतले परंतु त्यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे नाव संतोष भिला सोनवणे वय ३७ रा. नांद्रा ता. पाचोरा जि. जळगाव असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले व गुन्हयातील फसवणुकीची रक्कम रोख रुपये ५,००,०००-०० (अक्षरी पाच लाख रुपये) तसेच बनावट आधारकार्ड, सातबारा उतारा, खरेदी खताच्या नकला इ. दस्तऐवज पोलीसांनी हस्तगत केलेल्या आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मागदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक परशुराम दळवी, पो.उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, पो. पोहवा ज्ञानेश्वर महाजन, पोहवा राहूल शिंपी, पोहवा/विश्वास देशमुख, पोकों/योगेश पाटील, पोकों/सागर पाटील, पोकों/जितेश पाटील यांचे पथकाने केली आहे. अटक आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन अटक आरोपीताने त्याचे साथीदारांचे मदतीने अशाच प्रकारचे गुन्हे यापूर्वी केल्याची शक्यता असुन त्यादृष्टीने पाचोरा पोलीस पुढील तपास करीत आहे.
तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नविण जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असतांना मुळ दस्तऐवजाची खात्री करीत असतांना लिहून देणार व घेणार यांची पक्की खात्रीशिर ओळख पटविण्यात येवुनच खरेदी विक्रीचे व्यवहार पुर्ण करावे. अनोळखी इसमांशी कोणताही आर्थीक व्यवहार करण्यात येवु नये. करायचे असल्यास वरील प्रमाणे पुर्ण पडताळणी करुनच व्यवहार करावे.
पोलीस निरीक्षक पाचोरा पो.स्टे.जि. जळगांद
Comments
Post a Comment