माळी समाजाचा दिनांक २५ जाने.२०२५ शनिवारी जळगावात सर्व पोटशाखीय वधू वर-मेळावा संपन्न होत आहे.!!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(जळगाव) महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगाव
जिल्हा आयोजीत २५ वा सर्व पोटशाखीय वधु-वर पालक परिचय मेळावा उद्या दि.२५ जानेवारी रोजी सकाळी १० वा. सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहात (लेवा भवन) येथे संपन्न होत आहे. महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर हे अध्यक्षस्थान भुषवणार असून मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांचे हस्ते होणार आहे. याप्रसंगी समाजाचे उत्तमराव महाजन, ज्ञानेश्वर महाजन, विकास पाटील (सरपंच, नशीराबाद ), मनोज माळी, तहसीलदार विजय बनसोडे, माजी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, डॉ नलीन महाजन, संजय खैरनार, दिलीप पंढरीनाथ पाटील यांचेसह मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रवीण माळी (शिरपूर) यांचा तुफान विनोदी खान्देशी 'आयत पोयत सख्यानं' हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मेळाव्याकरिता सर्व समाज बंधु-भगिणींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष शाम पाटील सर, भीमराव महाजन, भास्कर पाटील, दिनेश पाटील, वैशाली महाजन, धनराज माळी सर, गायत्री क्षीरसागर, अंतू लहासे यांचेसह पदाधिकाऱ्यांनी पत्रकाव्दारे केलेली आहे.
Comments
Post a Comment