अभिनव बहुउद्देशीय संस्था व डी एम एल टी कॉलेज भडगाव तर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन हे डॉ.सुवर्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव येथील अभिनव बहुउद्देशीय संस्था कॉलेज तर्फे दरवर्षी विद्यार्थी दिनाकरिता विशेष कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, स्पर्धा परीक्षा तसेच जनरल नॉलेज संदर्भात त्यांना माहिती दिली जाते.
तसेच महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज ,श्री महात्मा गांधी, श्री विवेकानंद महाराज , श्री महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार व त्यांनी केलेले कार्य यावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन दिले जाते.
तसेच क्रांतिवीर सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींकरता शिक्षणाची गरज असून त्या संदर्भात मार्गदर्शन केले गेले.
तसेच विविध स्पर्धा व गायन स्पर्धा भाषण इत्यादी विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री दिलीप पाटील, डॉक्टर सुवर्णा पाटील, शिक्षक वृंद नेहेते सर, चंदा पाटील ,महिमा चौधरी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी केले तर आभार चंदा पाटील मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment