२६ जाने.च्या पुर्वसंध्येला पाचोरा पोलिस प्रशासानाची उल्लेखनीय कामगिरी,दोन गावठी कट्टे व चार काडतुस जप्त..!!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दिनांक :- २७/०१/२०२५(पाचोरा पोलिस स्टेशन)
दिनांक २६/०१/२०२५ रोजी पोउपनिरी/श्री. प्रकाश चव्हाणके, पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिपी, पोकों/६२० दिनेश महावु पाटील असे पाचोरा पोलीस ठाणे हददीतील घडणारे गुन्हे उघडकिस आणणेसाठी च पाहिजे फरार आरोपीतांचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक सो, श्री. अशोक पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ए १ काटा, जारगांव चौफुली, पाचोरा परिसरात एक इसम त्याचे कब्जात अग्नीशरवे (गावठी कटटे) घेवुन तो कोठेतरी गुन्हेगारी कारवाया करण्याची शक्यता आहे. तरी सदर इसमाचा शोध घेवुन त्याचेजयळील अनाधिकृत अम्नीशरखे (गावठी कटटे) जप्त करणे आवश्यक असल्याने, सापळा रचून छापा घालून तात्काळ कारवाई करा बाबत आदेश दिल्याने त्यानुसार मिळालेली बातमीप्रमाणे लागलीच स्थानीक दोन पंचाना बोलावुन लागलीच ए १ काठा, पाचोरा पाचे आडोशाला जावून थांबून तेथे एक इसम येचुन संशयीतरित्या चावरत असतांना व त्याचे कंबरेस वारंवार हात लावत असतांना दिसला. बातमी प्रमाणे खात्री होताच सदर इसमांस चारही बाजुने होवून त्यास जहुर भाई रेडीअर्स, चुकानाजवळ १६.३० वा. जागीचे पकडले. तेव्हा तो पॅन्टचे खिशात हात घालत असतांना पोकों/६२० दिनेश पाटील यांनी त्याचे दोन्ही हात दाबुन धरले. सदर इसमांस ताब्यात घेवून त्यास त्याचे नाब, गाव विचारता त्याने त्याचे नाव अरबाज खान जहुर खान, वय. २४ वर्षे, रा. अक्सा नगर, जारगांच, ता. पाचोरा, जि. जळगांच असे सांगीतले. त्यास त्याच्या अंगझडतीचा उददेश समजाचुन सांगुन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात पॅन्टच्या खिश्यात खालील वर्णनाचे पिस्टल व राउंड मिळुन आले. त्याचे वर्णन खालील प्रमाणे,
१) २०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल, सिंगल बोअरचे, बोअरच्या खाली चेंबर, पिस्टल ट्रिगर लोखंडाचे, पिस्टलला लोखंडी मॅग्झीन असलेले, संपूर्ण बॉडी लोखंडी असलेली. त्याचे
पकडण्याचे ग्रिपला दोन्ही बाजूंनी लाल रंगाचे स्टारची (1) निशाणी अशा वर्णनाचे जु.वा.किं.सु.
२) २०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल, सिंगल बोअरचे, बोअरच्या खाली चेंबर, पिस्टल ट्रिगर लोखंडाचे, पिस्टलला लोखंडी मॅग्झीन असलेले, संपूर्ण बॉडी लोखंडी असलेली.
३) २,०००/- रुपये किंमतीचे पितळी कैंप असलेले ४ जिवंत काडतुस, सदर काडतुसचे पुढील टोक निमुळते, काडतुसचे पाठीमागील बाजूस रिंग असलेली अशा वर्णनाचे जु.वा.कि.सु.
४२,०००/- रुपये एकुण
तरी यातील आरोपी नामे अरबाज खान जहुर खान, वय. २४ वर्षे, रा. अक्सा नगर, जारगांव, ता. पाचोरा, जि. जळगांव यांस पोलीस ठाणे येथे आणून त्याचेविरुध्द पाचोरा पोलीस ठाणे गु.रजि.क्रमांक ४०/२०२५, भारतीय शस्व अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन यातील आरोपी यांस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनिरी/प्रकाश चव्हाणके हे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. माहेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्रो, श्री. धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार, पोउपनिरी/श्री. प्रकाश चव्हाणके, पोहेकौं /६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकों/१२३० दिनेश महादु पाटील यांनी पार पाडली आहे.
Comments
Post a Comment